निवडणुकीत भाजपाच्या विचारसरणीचा पराभव निश्चित; काँग्रेसला ठाम विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 02:25 AM2018-08-19T02:25:22+5:302018-08-19T06:43:59+5:30

पक्षाची संघटना बांधणी मजबूत करण्याचे आव्हान

BJP's ideology of defeat in the elections; Congress strongly believes | निवडणुकीत भाजपाच्या विचारसरणीचा पराभव निश्चित; काँग्रेसला ठाम विश्वास

निवडणुकीत भाजपाच्या विचारसरणीचा पराभव निश्चित; काँग्रेसला ठाम विश्वास

Next

- शीलेश शर्मा 

नवी दिल्ली : भाजपामुक्त भारत करण्यात काँग्रेसला अजिबात स्वारस्य नाही. भाजपाची एक विचारसणी आहे. तेव्हा भाजपाही असावा. तथापि, काँग्रेस आपल्या तत्त्वाने भाजपाची विचारसरणी पराभूत करेल. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस मित्र पक्षांच्या सहकार्याने भाजपा व मित्रपक्षांच्या तुलनेत निश्चित अधिक जागा जिंकेल, असा विश्वास काँग्रेसने व्यक्त केला आहे. परंतु आगामी निवडणुकीत काँग्रेसपुढे संघटन बळकट करण्याचे मोठे आव्हान आहे.

संघटन अभावामागचे विश्लेषण काँग्रेसने केले असता २०१४ च्या आधी काँग्रेसने संघटना मजबूत करण्यावर लक्षच दिले नसल्याचे लक्षात आले आहे. गुजरात विधानसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेस नेतृत्वाने संघटना बळकट करण्यावर भर दिला आहे.
२०१४ मध्ये मोदींच्या राजवटीत भाजपाची रणनीती विरोधकांची प्रतिमा मलिन करण्यावर केंद्रित होती. परिणामी, राजकीय संवादाची प्रतिष्ठा खालावली. तथापि, वैचारिक मतभेद असतानाही पंतप्रधानांबाबत अपशब्द किंवा गैर बोलले जाणार नाही, याची काँग्रेसने नेहमीच दक्षता घेतली. परंतु दुर्दैवाने, पंतप्रधान मोदी यांची शैली आणि भाजपाने प्रचाराची वेगळीच पद्धत अंगीकारत याबाबत सौजन्यच राखले नाही. काँग्रेसने आपल्या भूमिकेने मोदींची रणनीती अपयशी केली. मात्र, भाजपाच्या तुलनेच प्रचारासाठी मर्यादित संसाधने असतानाही काँग्रेस भाजपाचा जोमाने मुकाबला करीत आहे.

सर्व विरोधी पक्ष मिळून मोदींना पराभूत करणार, हे मात्र निश्चित, असा काँग्रेसला आत्मविश्वास आहे. बेरोजगारीमुळे युवकांत नाराजी आहे. नोटांबदीने देशाचे नुकसान झाले आहे. पण सरकार नोटबंदीचे फायदेही सांगत नाही. मुळात सरकारलाच अद्याप याचे आकलनच झालेले नाही.

२०१४ मध्ये भाजप आणि संघाने पद्धतशीर प्रचार करून काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत देशभरात काँग्रेसविरुद्ध वातावरण निर्माण केले. राफेल घोटाळ्याचा मुद्दा संसदेत उपस्थित केला असता पंतप्रधान मोदी नजर भिडवू शकत नाहीत. कारण यात घोटाळा झालेला आहे, हे खरे आहे. काँग्रेस मात्र हा मुद्दा जनतेसमोर नेणार आहे. हा घोटाळा कसा झाला, हे जनतेच्या दरबारात सांगितले जाईल. घोटाळा कोणी आणि कसा केला, हे सरकार का सांगत नाही? असा सवाल काँग्रेस सातत्याने करत आहे.

तीन राज्यांत पराभव करू
मोदी यांना सत्तेबाहेर करणे शक्य नाही, असे काही लोक ठणकावून सांगत आहेत. तथापि, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी मोदींना सत्तेबाहेर केले जाईल, असा ठाम विश्वास काँग्रेसला आहे. या वर्षअखेर मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निकालातून मोदी यांना सत्तेबाहेर करण्यास काँग्रेसचा किती दृढसंकल्प आहे, हे सिद्ध होईल.

Web Title: BJP's ideology of defeat in the elections; Congress strongly believes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.