चार राज्ये जिंकण्याचे भाजपाचे लक्ष्य
By Admin | Updated: August 10, 2014 03:31 IST2014-08-10T03:31:36+5:302014-08-10T03:31:36+5:30
महाराष्ट्रासह चार राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुका जिंकणो, हे यापुढील आपले पहिले लक्ष्य असणार आह़े

चार राज्ये जिंकण्याचे भाजपाचे लक्ष्य
>नवी दिल्ली : महाराष्ट्रासह चार राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुका जिंकणो, हे यापुढील आपले पहिले लक्ष्य असणार आह़े तेव्हा विजयासाठी सज्ज व्हा, असे आवाहन भाजपाचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केल़े महाराष्ट्रात भाजपाचाच मुख्यमंत्री होईल, असे जोरकसपणो सांगताना राज्यात शिवसेनेसोबत युती आहे व मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा व्हायची आहे, याचा त्यांना विसर पडल्याचे दिसले.
भाजपाच्या राष्ट्रीय परिषदेला शनिवारी दिल्लीत सुरुवात झाली़ या वेळी ते बोलत होत़े पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, माजी अध्यक्ष राजनाथसिंह उपस्थित होत़े
महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा व जम्मू-काश्मीर या राज्यांतील निवडणुकांसाठीही सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी भाजपा नेते व कार्यकत्र्याना केल़े देशाला काँग्रेसमुक्त करण्यासाठी भाजपाचे विचार देशाच्या कानाकोप:यात पोहोचवावे लागतील़ यासाठी प्राणपणाने कामाला लागा़, अशा शब्दांत त्यांनी भाजपा कार्यकत्र्यात उत्साह पेरण्याचे प्रयत्न केल़े
लोकसभा निवडणुकीतील विजयाचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांना दिल़े अमित शहा लोकसभा निवडणुकीतील मॅन ऑफ दि मॅच आहेत़, अशा शब्दांत मोदींनी शहा यांचे कौतुक केले.