शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे माजी मुख्यमंत्री म्हणाले, मध्य प्रदेशात येईल काँग्रेसची सत्ता; शुभेच्छाही दिल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 17:39 IST

मध्य प्रदेशमध्ये भाजपा सत्ता राखणार की काँग्रेस दीर्घकाळानंतर राज्यातील सत्तेत पुनरागमन करणार याची चर्चा रंगली आहे. यादरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल गौर यांचे एक विधान चर्चेचा विषय ठरले आहे.

ठळक मुद्देभाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री बाबुलाल गौर यांनी राज्यात काँग्रेसची सत्ता येईल, असे म्हटल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. भोपाळ येथून निवडणूक लढवत असलेले काँग्रेस आमदार आरिफ अकील बाबूलाल गौर यांना भेटण्यासाठी आले होते, त्यावेळी गौर यांनी हे भाकित केले. संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बाबूलाल गौर आणि आरिफ अकिल यांनी स्पष्टीकरण दिले आहे

भोपाळ - अत्यंत अटीतटीच्या वातावरणात प्रचार झाल्यानंतर 28 नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य मतदरांनी विक्रमी मतदानासह EVM मध्ये बंद केले आहे. आता मध्य प्रदेशमध्ये भाजपा सत्ता राखणार की काँग्रेस दीर्घकाळानंतर राज्यातील सत्तेत पुनरागमन करणार याची चर्चा रंगली आहे. मात्र भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री बाबुलाल गौर यांनी राज्यात काँग्रेसची सत्ता येईल, असे म्हटल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. भोपाळ येथून निवडणूक लढवत असलेले काँग्रेस आमदार आरिफ अकील बाबूलाल गौर यांना भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी  त्यांच्यासोबत गप्पागोष्टी करण्याच्या ओघात बाबूलाल गौर यांना राज्यात काँग्रेसचा विजय होईल, तसेच तुम्ही मंत्री व्हाल, असे सांगून त्यांना शुभेच्छाही दिल्या. यावेळी काँग्रेसने माझ्या सुनेला तिकीट मिळवून देण्यासाठी मदत केली, असेही बाबूलाल गौर म्हणाले, तसेच सरताज सिंह यांना तिकीट न दिल्याबद्दल त्यांनी भाजपाबाबत नाराजीही व्यक्त केली. दरम्यान, या संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बाबूलाल गौर आणि आरिफ अकिल यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी ज्येष्ठ नेते बाबूलाल गौर यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होते, असे आरिफ अकिल असे म्हणाले. तर बाबूलाल गौर यांना सांगितले की,  जर माझ्या घरी कुणी आले तर त्या मी शाप तर देणार नाही ना? कुणी घरी आलं तर त्याला मिठाईच देईन, विष थोडेच देईन, हे आमचे प्रेम आहे. त्याला राजकारणाशी जोडी नका. 

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018BJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण