लोकसभेतील गोंधळी खासदारांविरोधात भाजपाची निदर्शने
By Admin | Updated: August 16, 2015 23:44 IST2015-08-16T23:44:32+5:302015-08-16T23:44:32+5:30
नाशिक : लोकसभा अधिवेशनात गोंधळ घालून कामकाज होऊ न देणार्या काँग्रेसच्या गोंधळी खासदारांविरोधात भारतीय जनता पार्टीचे प्रदेश संघटन सरचिटणीस रवि भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी त्र्यंबक नाक्यावर निदर्शने करून निषेध करण्यात आला़ यावेळी भुसारी यांनी बोलताना सांगितले की, काँग्रेसच्या गोंधळी खासदारांमुळे लोकसभेचे अधिवेशन वाया गेले, कोणतेही महत्त्वपूर्ण निर्णय घेता आले नाही़ भाजपा सरकारने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकारली असून, ते रडीचा डाव खेळत आहेत़ यावेळी आमदार देवयानी फरांदे, राजू भोळे, शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, विजय साने, सुहास फरांदे, सुरेश पाटील, सुनील केदार आदिंसह कार्यकर्ते सहभागी झाले होते़ (प्रतिनिधी)

लोकसभेतील गोंधळी खासदारांविरोधात भाजपाची निदर्शने
न शिक : लोकसभा अधिवेशनात गोंधळ घालून कामकाज होऊ न देणार्या काँग्रेसच्या गोंधळी खासदारांविरोधात भारतीय जनता पार्टीचे प्रदेश संघटन सरचिटणीस रवि भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी त्र्यंबक नाक्यावर निदर्शने करून निषेध करण्यात आला़ यावेळी भुसारी यांनी बोलताना सांगितले की, काँग्रेसच्या गोंधळी खासदारांमुळे लोकसभेचे अधिवेशन वाया गेले, कोणतेही महत्त्वपूर्ण निर्णय घेता आले नाही़ भाजपा सरकारने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकारली असून, ते रडीचा डाव खेळत आहेत़ यावेळी आमदार देवयानी फरांदे, राजू भोळे, शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, विजय साने, सुहास फरांदे, सुरेश पाटील, सुनील केदार आदिंसह कार्यकर्ते सहभागी झाले होते़ (प्रतिनिधी)