शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
6
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
7
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
8
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
9
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
10
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
11
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
12
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
13
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
14
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
15
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
16
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
17
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
18
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
19
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!

भाजपच्या ‘दिल्ली-बिहार’ मिशनवर होऊ शकतो परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 06:11 IST

महाराष्ट्र, हरयाणातील निकालाचा फटका

- संतोष ठाकूर नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाने भाजपच्या ‘बिहार आणि दिल्ली मिशनवर’ परिणाम होण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये भाजप आपल्या प्रभावाच्या बळावर जेडीयूवर दबाव वाढविण्याचा प्रयत्न करीत होती. दिल्लीतही आम आदमी पार्टीविरुद्ध आक्रमक मोहीम उभारण्याची तयारी सुरू होती. तथापि, महाराष्ट्र आणि हरयाणातील निवडणूक निकालानंतर या दोन्ही राज्यांसाठी भाजपला आता आपल्या रणनीतीत बदल करावा लागू शकतो. या दोन्ही राज्यांत पुढच्या वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे.

सूत्रांनुसार भाजप महाराष्ट्रप्रमाणे बिहारमध्ये मित्रपक्ष जेडीयूवर दबाव वाढविण्याच्या प्रयत्नात होती. सरकारमध्ये वरचश्मा राखण्यासाठी भाजपच्या जागा वाढवून घ्याव्यात, अशी मागणी भाजपच्या काही नेत्यांनी केली होती. त्यानंतर जेडीयूने प्रत्युत्तर देत प्रतिक्रिया दिली होती. तथापि, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने बिहारमध्ये मित्रपक्षांसोबत निवडणूक लढविली जाणार असल्याचे स्पष्ट केले होते.

परंतु जाणकारांनुसार भाजप बिहारमध्ये आपला दबदबा वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्र आणि हरयाणामधील निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजप आपला हा बेत तूर्त स्थगित करून योग्य वेळेची वाट पाहणे पसंत करील. जेणेकरून अनपेक्षित निकालाला सामोरे जावे लागू नये.

भाजपसाठी सर्वात मोठे आव्हान दिल्लीत सरकार स्थापन करण्याचे आहे. दिल्ली देशाची राजधानी असून, भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचा तिथे वावर असतो. दुसरीकडे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सातत्याने भाजपला आव्हान देत असतात. दिल्ली आणि केंद्र सरकारदरम्यान सातत्याने संघर्ष होताना दिसतो.

नव्याने आखावी लागणार रणनीती

दिल्ली विधानसभेच्या आगामी निवडणुकीत केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सत्तेपासून दूर ठेवण्याचा भाजपचा बेत आहे; परंतु महाराष्ट्र आणि हरयाणातील निवडणूक निकालानंतर केजरीवाल सरकारचे मनोबल उंचावले आहे.भाजपच्या रणनीतीकारांनाही असे वाटते की, केजरीवाल निवडणूक प्रचारात या दोन राज्यांतील भाजपच्या स्थितीचा हवाला देत केंद्र सरकारच्या धोरणांवर हल्ला चढवतील. या पार्श्वभूमीवर दिल्लीत सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला नव्याने रणनीती आखावी लागेल.

टॅग्स :BJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019haryana election 2019हरियाणा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा