शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून भाजपाच्या मित्र पक्षाचा यू-टर्न; आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2019 17:38 IST

गेल्या अनेक दिवसांपासून भाजपाच्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध केला जात आहे.

गुवाहाटीः गेल्या अनेक दिवसांपासून भाजपाच्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध केला जात आहे. ईशान्येकडील राज्ये या विधेयकावरून भडकलेली असतानाच आता भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या आसाम गण परिषदेनंही या कायद्याच्या पाठिंब्यावरून यू-टर्न घेतला आहे. आसाम गण परिषदेनं भाजपाच्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा दिला होता, परंतु आता आसाम गण  परिषद या विधेयकाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहे. विशेष म्हणजे आसाम गण परिषदेनं संसदेत या विधेयकाच्या बाजूनं मतदान केलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी दास यांच्या नेतृत्वात आसाम गण परिषदेचं एक प्रतिनिधीमंडळ दिल्लीला जाणार आहेत. दीपक दास म्हणाले, आसाम गण परिषद ही सामान्य नागरिकांच्या भावनांचा सन्मान करते. ज्यांना या कायद्यामुळे स्वतःचं अस्तित्व आणि ओळख संकटात येऊ शकते, असं वाटतं त्यांच्यासोबत आम्ही आहोत. राज्यसभेचे माजी सदस्य राहिलेल्या दास यांनी सांगितलं की, नागरिकत्व सुधारणा कायदा मागे घेण्यासाठी आम्ही कायदेशीर प्रक्रियेचा मार्ग अवलंबणार आहोत. कारण या कायद्यानं आसामचे मूळचे रहिवासी असलेल्या नागरिकांच्या ओळख, भाषेच्या अस्मितेला धोका पोहोचू शकतो. आसाममध्ये अवैध प्रवाशांची होत असलेली घुसखोरी पाहता 1970च्या दशकात भडकलेल्या विद्यार्थ्यांनी आसाम गण परिषदेची स्थापन केली होती. हा पक्ष सध्या राज्यातील सर्वानंद सोनोवाल यांच्या सरकारचा भाग आहे. राज्यसभेत त्यांच्या एकमेव सदस्यानं विधेयकाच्या बाजूनं मतदान केलं होतं. नव्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आसामसह ईशान्य भारतातील इतर राज्यांत पेटलेल्या आंदोलनाची धग शुक्रवारी आणखी वाढली आहे. गुवाहाटीमध्ये संचारबंदीला न जुमानता लोक रस्त्यावर उतरून निदर्शने करत असून बाजारपेठा, दुकाने सर्व बंद आहेत. वाहतूक व जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या या दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे कायद्यात रूपांतर झालेल्या कायद्याविरोधात आंदोलनाने सर्वात रौद्र रूप आसाममध्ये धारण केले आहे. तिथे निदर्शनांमुळे सर्व रस्ते बंद असल्याने काही रेल्वे स्थानके व विमानतळावर अनेक प्रवासी अडकून पडले आहेत. या कायद्यामुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून आलेल्या अल्पसंख्याकांना भारताचं नागरिकत्व बहाल केलं जाणार आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय