शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची ११ उमेदवारांची ८ वी यादी जाहीर; सनी देओलला मिळाला डच्चू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 22:54 IST

भाजापाने आत्तापर्यंत महाराष्ट्रात २४ उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली आहे.

लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाने ८ वी यादी जाहीर केली असून पंजाबच्या गुरुदासपूरमधून अभिनेता सनी देओलचा पत्ता कट करण्यात आला आहे. भाजपाने ११ उमेदवारांची आठवी यादी जाहीर केली असून पंजाबमधील ६ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. तर, ओडिशातून ३ आणि पश्चिम बंगालमधून २ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. भाजपाच्या ८ व्या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नाही. त्यामुळे, महाराष्ट्रातील काही मतदारसंघातील उमेदवारांच्या नावासाठी अजूनही वेट अँड वॉच अशीच परिस्थिती आहे. 

भाजापाने आत्तापर्यंत महाराष्ट्रात २४ उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये, पहिल्या टप्प्यात २०, दुसऱ्या टप्प्यात ३ आणि तिसऱ्या टप्प्यात अमरावतीमधून नवनीत राणा यांना उमेदवारा देण्यात आली आहे. अद्यापही महाराष्ट्रातील काही जागांवरुन महायुतीत चर्चा सुरू आहे. त्यामुळे, सातारा, धाराशिव, नाशिक आणि संभाजीनगर येथील उमेदवारांची नावे अद्याप निश्चित झालेली नाहीत. त्यातच, भाजपाने आज उमेदवारांची ८ वी यादी जाहीर केली. मात्र, या यादीतही महाराष्ट्रातील एकही नाव नाही.  भाजपाच्या ८ व्या यादीत पंजाबमधील ६ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये, गुरुदासपूर येथून अभिनेता सनी देओलचे तिकीट कापण्यात आलं आहे. त्या मतदारसंघातून दिनेश सिंह बब्बू यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. सनी देओलचा लोकसभेतील परफॉर्मन्स अतिशय नगण्य राहिला आहे. तर, अनुपस्थितीही मोठ्या प्रमाणात होती. त्यातच, यापुढे आपण कधीही निवडणूक लढवणार नाही, असेही सनी देओलने स्पष्ट केले होते. त्यानंतर, आज पंजाबची यादी जाहीर झाली, तिथे त्याजागी नवीन उमेदवाराला संधी देण्यात आली आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रातील उर्वरीत उमेदवारांच्या नावांच्या यादीकडे आता महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :BJPभाजपाSunny Deolसनी देओलlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Punjabपंजाब