शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 07:04 IST

BJP Loksabha 400 seats in Trouble: मित्रपक्षांमुळे ४०० जागांवर विजय मिळविण्याची चिंता वाढली असून ‘अब की बार ४०० पार’ची घोषणा भाजपला बाजूला ठेवावी लागत आहे. 

- हरीश गुप्ता लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भाजपचे जवळपास ४० मित्रपक्ष काही राज्यांत डोकेदुखी ठरत आहेत. कारण, या निवडणुकीत ते १०० जागांवर निवडणूक लढत आहेत. मात्र, त्यांची कामगिरी समाधानकारक नाही. मित्रपक्षांमुळे ४०० जागांवर विजय मिळविण्याची चिंता वाढली असून ‘अब की बार ४०० पार’ची घोषणा भाजपला बाजूला ठेवावी लागत आहे. 

बिहारमध्ये भाजपचे मित्रपक्ष ४० पैकी २३ जागा लढवित आहेत; पण ते एकत्रितपणे प्रचार करू शकत नाहीत. कारण, एलजेपीचे (रामविलास) अध्यक्ष चिराग पासवान यांनी २०२०च्या विधानसभा निवडणुकीत घेतलेल्या भूमिकेबद्दल मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी त्यांना माफ केलेले नाही. चिराग पासवान यांचा पक्ष पाच जागा लढवत आहे. आरएलएम आणि हम यांच्यापुढेही आव्हान आहे. जदयूही लढत असलेल्या १६ जागा जिंकू शकत नाही. 

कर्नाटकात सेक्स स्कॅण्डल उघडकीस आल्यानंतर एच. डी. देवेगौडा यांचा जनता दल  (एस) हा पक्ष भाजपसाठी अडचण ठरला आहे. त्यामुळे २०१९ मध्ये जिंकलेल्या २५ जागा जिंकणे कठीण आहे. उत्तर प्रदेशात भाजपने त्यांच्या मित्रपक्षांना (अपना दल-२, आरएलडी-२, एसबीएसपी-१ आणि निषाद-१) अशा सहा जागा दिल्या आहेत आणि २०१९च्या ६४ जागांची संख्या सुधारण्याची आशा आहे. 

केरळात खाते उघडण्याची आशाआंध्र प्रदेश हे कदाचित एकमेव राज्य आहे, जिथे भाजप चांगली कामगिरी करेल आणि लोकसभेच्या २५ पैकी बहुतांश जागा जिंकू शकेल. कारण, युतीतील सहकारी पक्ष एकत्र काम करत आहेत. 

सहा जागा लढत असलेला भाजप चांगली कामगिरी करत आहे. तामिळनाडू आणि केरळात भाजप खाते उघडेल, असे वाटते. कारण, आठ छोट्या पक्षांसह येथे भाजप लढत आहे. झारखंडमध्ये २०१९ प्रमाणेच मित्रपक्ष एजेएसयूला एक जागा दिली आहे. पूर्वोत्तरमध्येही सात ते आठ मित्रपक्षांसोबत भाजप निवडणूक लढत आहे. 

महाराष्ट्रात ४१ जागा जिंकणे कठीण सर्वात जास्त काळजी महाराष्ट्रात आहे. २०१९ मध्ये जिंकलेल्या ४८ पैकी ४१ जागा यंदा कोणत्याही सर्वेक्षणातून ‘एनडीए’ला मिळताना दिसत नाहीत.  शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) हेही लढत असलेल्या १९ जागांवर फारशी चांगली कामगिरी करण्याची शक्यता नाही. मात्र, भाजपची कामगिरी चांगली राहील, असे सांगितले जात आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपा