शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

मध्य प्रदेशात 10 दिवसांत 4 भाजपा नेत्यांच्या हत्या; कार्यकर्ते रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 2:31 PM

हल्लेखोर अद्याप न सापडल्यानं भाजपा कार्यकर्ते संतप्त

भोपाळ: मध्य प्रदेशात गेल्या 10 दिवसात 4 भाजपा नेत्यांच्या हत्या झाल्या आहेत. त्यामुळे आज मध्य प्रदेशात आज भाजपा कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात आंदोलन केलं आहे. रविवारी बडवानीत भाजपाचे मंडलचे अध्यक्ष मनोज ठाकरे यांची निर्घृण हत्या झाली. ही हत्या राजकीय हेतूनं करण्यात आल्याचा आरोप भाजपानं केला. याचे पडसाद दिल्लीतही उमटले. रविवारी बडवानीमध्ये भाजपाचे मंडल अध्यक्ष मनोज ठाकरेंची हत्या झाली. ते सकाळी फिरण्यासाठी निघाले होते. त्यावेळी दगडांनी ठेचून त्यांची हत्या झाली. त्यांच्या मृतदेहाजवळ रक्तानं माखलेला दगड आढळून आला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मात्र अद्याप गुन्हेगार हाती लागलेले नाहीत. रविवारी संध्याकाळी गुनामध्ये परमाल कुशवाह नावाच्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या झाली. परमाल भाजपाचे संयोजक शिवराम कुशवाह यांचा नातेवाईक होता. यामागे काँग्रेसचा हात असल्याची टीका भाजपानं केली आहे. गुरुवारी संध्याकाळी प्रल्हाद बंधवार यांची भरबाजारात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बंधवार यांनी दोनवेळा मंदसौर नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून काम केलं आहे. बंधवार संध्याकाळी सातच्या सुमारास जिल्हा सहकारी बँकेच्या समोर भाजपा नेते लोकेंद्र कुमावत यांच्या दुकानात बसले होते. ते तिथून बाहेर पडताच बुलेटवरील एकानं त्यांना गोळी घातली. बुलेटवरील हल्लेखोर शार्ट शूटर असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बुधवारी संध्याकाळी इंदूरमधील व्यावसायिक आणि भाजपा नेते संदीप अग्रवाल यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अद्याप या हल्लेखोरांना अटक झालेली नाही. विशेष म्हणजे शहरातल्या सर्वाधिक वर्दळ असलेल्या चौकात ही हत्या झाली. ज्या ठिकाणी हत्या करण्यात आली, त्या भागापासून पोलीस स्टेशन अवघं 100 मीटर दूर आहे. यानंतर अग्रवाल यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांचा मृत्यू झाला.  

टॅग्स :BJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेशMurderखूनcongressकाँग्रेस