शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

BJP: भाजपासाठी ३० वर्षे काम केले, पण पक्षाने किड्या-मुंगीप्रमाणे बाजूला केले,  नेत्याला अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 13:46 IST

BJP News: मध्य प्रदेशमधील एका नेत्याचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. हा नेता पत्रकार परिषदेमध्ये ओक्साबोक्शी रडताना दिसत आहे. या नेत्याचं नाव राजकुमार धनौरा असं आहे. पक्षानं त्यांची हकालपट्टी केल्याने त्यांना अश्रू अनावर झाले.

भोपाळ - मध्य प्रदेशमधील एका नेत्याचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. हा नेता पत्रकार परिषदेमध्ये ओक्साबोक्शी रडताना दिसत आहे. या नेत्याचं नाव राजकुमार धनौरा असं आहे. पक्षानं त्यांची हकालपट्टी केल्याने त्यांना अश्रू अनावर झाले. धनौरा यांनी सांगितले की, मी गेल्या तीस वर्षांपासून पक्षासाठी काम करत होतो. मात्र मला किडा-मुंगीप्रमाणे पक्षातून बाजूला करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार धनौरा यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. 

पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर धनौरा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, मी संघटनेसमोर म्हणणं मांडलं. अध्यक्ष बी. डी. शर्मा यांचीही भेट घेतली. जर काही चूक झाली असेल तर मी पक्षाची माफी मागतो, असेही सांगितले. मात्र त्यानंतरही माझ्यावर हा अन्याय करण्यात आला. ज्या पक्षासाठी मी ३० वर्षे मेहनत केली. माझ्यावर एक रुपयाचाही कलंक असेल तर सांगा. पक्षाने मला ३० वर्षांच्या मेहनतीनंतरही एका मिनिटात किड्या-मुंगीप्रमाणे उचलून फेकून दिले. एवढं बोलून ते भावूक झाले आणि रडू लागले. \

सुरखी तेथील आमदारांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने राजकुमार धनौरा यांच्यावर पक्षाने ही कारवाई केली आहे. मध्य प्रदेशातीलभाजपाचे प्रदेशाध्यक्ष बीडी शर्मा यांनी राजकुमार धनौरा याला पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे.

टॅग्स :BJPभाजपाMLAआमदारMadhya Pradeshमध्य प्रदेश