शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशात भाजपा 28 जागा जिंकला, पण फायदा काँग्रेसला झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 17:00 IST

पाच महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करणाऱ्या भाजपाने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशमध्ये दणदणीत विजय मिळवला. मात्र...

भोपाळ - पाच महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करणाऱ्या भाजपाने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशमध्ये दणदणीत विजय मिळवला.  राज्यातीली 29 पैकी 28 जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपाने मिळवलेला विजय राज्यातील अस्थिर सत्ता स्थिर करण्याच्या दृष्टीने काँग्रेसच्या पथ्यावर पडला आहे. त्याचे कारण म्हणजे मध्य प्रदेश विधानसभेतील भाजपाचा एक आमदार लोकसभेच्या निवडणुकीत निवडणून आला आहे. त्यामुळे मध्य प्रदेश विधानसभेत भाजपाचे संख्याबळ एकने घटण्याची शक्यता निर्माण झाली असून, विधानसभेची सदस्यसंख्याही एकने घटून 115 सदस्य असलेल्या काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे पुढच्या सहा महिन्यांसाठी काँग्रेसची सत्ता स्थिर झाली आहे. रतलाम येथील भाजपा खासदार जी. एस. दामोह यांना पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट दिले होते. आता दामोह हे लोकसभेवर निवडून आल्याने त्यांना विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे मध्य प्रदेश विधानसभेतील भाजपाचे संख्याबळ एकने घटून 108 वर घसरणार आहे. नव्या सदस्याची नियुक्ती होईपर्यंत विधानसभेतील सदस्यसंख्या 229 एवढीच राहणार आहे. त्यामुळे 115 सदस्य असलेल्या काँग्रेसला काही काळासाठी का होईना आपोआप स्पष्ट बहुमत मिळाले आहे.  भाजपा नेते सीताराम शर्मा आणि माजी मुख्य सचिव भगवानदास सांगतात की विधानसभेत सध्या 229 एवढी सदस्यसंख्या असल्याने काँग्रेसकडे पूर्ण बहुमत झाले आहे. तर आम्हाला सरकार पाडण्याची कोणतीही घाई नाही आहे, असे राज्यातील कमलनाश सरकारची घटिका भरत आली आहे, असा वारंवार दावा करणारे विधानसभेतील विरोधी पक्षनेते गोपाल भार्गव यांनी सांगितले.  दामोह यांच्या राजीनाम्यामुळे विधानसभेतील घटणाऱ्या संख्याबळाबाबत विचारले असता भाजपा नेते सीताराम शर्मा यांनी आम्ही याबाबत विचारच केला नव्हता, असे उत्तर दिले. तसेच राज्यातील कमलनाश सरकार पाडण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न सुरू नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल