शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशमध्ये उसळणार मोदी लाट, काँग्रेसला जनता दाखवणार 'हात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 19:35 IST

लोकसभेच्या मध्य प्रदेशातील एकूण २९ जागांपैकी २३ जागा भाजपाला, तर केवळ ६ जागा काँग्रेसला मिळतील, असा जनमत चाचणीचा निष्कर्ष आहे. भाजपाला काँग्रेसपेक्षा ४ टक्के जास्त मतं मिळतील, असंही नमूद करण्यात आलंय. 

ठळक मुद्देमध्य प्रदेशातील एकूण २९ जागांपैकी २३ जागा भाजपाला, तर केवळ ६ जागा काँग्रेसला मिळतील?भाजपाला काँग्रेसपेक्षा ४ टक्के जास्त मतं मिळतील, असंही नमूद करण्यात आलंय. गेल्या निवडणुकीत मध्य प्रदेशात काँग्रेसला दोन जागा मिळाल्या होत्या.

नवी दिल्ली : मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला पराभवाचा धक्का बसला असला, तरी लोकसभेच्या निवडणुकीत इथले मतदार पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच साथ देतील आणि त्या जोरावर काँग्रेस सपाट होईल, असा अंदाज एबीपी-सी व्होटरच्या सर्वेक्षणात वर्तवण्यात आला आहे.   

लोकसभेच्या मध्य प्रदेशातील एकूण २९ जागांपैकी २३ जागा भाजपाला, तर केवळ ६ जागा काँग्रेसला मिळतील, असा जनमत चाचणीचा निष्कर्ष आहे. भाजपाला काँग्रेसपेक्षा ४ टक्के जास्त मतं मिळतील, असंही नमूद करण्यात आलंय. 

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीचे निकाल ११ डिसेंबरला लागले होते. त्यात भाजपाचे बारा वाजले होते. तीनही राज्यं भाजपाच्या हातातून गेली होती आणि त्यांच्या या गडांवर काँग्रेसनं झेंडा फडकवला होता. परंतु, लोकसभेचं आणि विधानसभेचं गणित वेगळं असतं, असेच संकेत ताज्या जनमत चाचणीतून मिळताहेत. मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसपेक्षा एक टक्का जास्त मतं मिळवूनही भाजपाला सत्ता गमवावी लागली होती. काँग्रेसला ११४ जागा मिळाल्या होत्या, तर भाजपाला १०९ जागांपर्यंत मजल मारता आली होती. मध्य प्रदेशचा मतदार शिवराजसिंह चौहान यांच्यावर अगदीच नाराज नसल्याचं हे आकडे स्पष्ट सांगत होते. ही जनता मोदींवर अजिबातच नाराज नसल्याचं सी व्होटर आणि एबीपी यांनी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आलंय. 

गेल्या निवडणुकीत मध्य प्रदेशात काँग्रेसला दोन जागा मिळाल्या होत्या. त्या सहापर्यंत वाढत असल्या, तरी भाजपाप्रणित एनडीए २३ जागा मिळवून मुसंडी मारेल, अशी चिन्हं आहेत. आता देशाचा हा मूड निवडणुकीपर्यंत टिकतो का, मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार तो बदलण्यासाठी काय प्रयत्न करतं, हे पाहावं लागेल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९