दहशतवाद्यांविरोधातील भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरला यशस्वी ठरलं. या ऑपरेशनची माहिती देशभरात पोहोचवण्यासाठी भाजपकडून तिंरगा यात्रा काढली जाणार आहे. १३ मे ते २३ मे या काळात देशाच्या वेगवेगळ्या भागात तिरंगा यात्रेचे आयोजन केले जाणार आहे. १० दिवस ही यात्रा चालणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
तिरंगा यात्रेच्या माध्यमातून भाजप जनतेपर्यंत ऑपरेशन सिंदूरबद्दलची माहिती पोहोचवणार आहे. भारताने देशाचा स्वाभिमान कशापद्धतीने बळकट केला, असा मेसेजही या माध्यमातून दिला जाणार आहे. तिरंगा यात्रा आयोजनाची जबाबदारी पक्षातील वरिष्ठ नेतते संबित पात्रा, विनोद तावडे, तरुण चुग या नेत्यांवर सोपवण्यात आली आहे.
भाजपचे वरिष्ठ नेते करणार तिरंगा यात्रेचे नेतृत्व
देशाच्या वेगवेगळ्या भागात काढल्या जाणाऱ्या या तिरंगा यात्रांचे नेतृत्व भाजपचे वरिष्ठ नेते करणार आहेत. ऑपरेशन सिंदूरचे यश हे राजकीय इच्छा शक्तीचे यश असल्याचे भाजपने म्हटले आहे. ऑपरेशन सिंदूरची जी उद्दिष्टे होती, ती शंभर टक्के पूर्ण झाल्याचेही भाजप नेत्यांकडून सांगितले जात आहे.
वाचा >>तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
भाजपचे नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, भारताने दहशतवाद्यांविरोधात लढाई लढली आणि लष्कराच्या साहसाने हे ऑपरेशन यशस्वी ठरले आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये राफेल विमानांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे आणि आपले वैमानिकही सुरक्षित परत आले आहेत.