शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सहकारी पक्षांना कमकुवत करतो; २०२४ मध्ये बहुमताने जिंकण्याचा नितीशकुमार यांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 10:42 IST

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही मोठ्या बहुमताने जिंकू, असा विश्वासही नितीशकुमार यांनी येथे जदयूच्या अधिवेशनात व्यक्त केला. 

- एस. पी. सिन्हा लोकमत न्यूज नेटवर्क पाटणा : भाजप सहकारी पक्षांना कमकुवत करतो. २०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने जदयूविरुद्ध कारस्थान केले, असा आरोप करतानाच याच कारणामुळे आम्ही भाजपची साथ सोडत सात पक्षांच्या महाआघाडीत सहभागी झालो, असे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी रविवारी स्पष्ट केले. 

  २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही मोठ्या बहुमताने जिंकू, असा विश्वासही नितीशकुमार यांनी येथे जदयूच्या अधिवेशनात व्यक्त केला. नितीशकुमार म्हणाले की, बिहारनंतर देशभरातील बिगरभाजप पक्षांना एकजूट करून केंद्रातील सत्तेतून भाजपला हटविले जाईल.  ते म्हणाले की, कुढनीमधील विजयामुळे भाजप खुश होत आहे. पण, हिमाचल आणि अन्य ठिकाणी झालेल्या पराभवाबद्दल ते चर्चा करत नाहीत. मोदी सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, आपण ७० वर्षांचा हिशेब मागता, तर आपलाही हिशेब द्या. स्वातंत्र्याच्या लढाईत लढणाऱ्यांबद्दल सवाल उपस्थित करता आणि ज्यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात काहीही केले नाही ते आज स्वत:ला सर्वांत मोठे देशभक्त असल्याचे सांगत आहेत. 

बिहारमधील सर्व जागा जिंकणार : ललन सिंह २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाआघाडी सर्व ४० जागा जिंकेल, असा दावा जदयूचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनी केला.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपा