‘मोदी पंतप्रधान आहेत तोवर बिनधास्त...’, राहुल गांधींच्या ट्विटवरून भाजप नेत्यानं साधला जोरदार निशाणा

By श्रीकृष्ण अंकुश | Published: January 1, 2021 04:02 PM2021-01-01T16:02:26+5:302021-01-01T16:08:32+5:30

सोशल मीडिया यूझर्स तर, ही वर्षातली पहिली राजकीय लढाई असल्याचे म्हणत आहेत.

BJP union minister Giriraj Singh on congress leader Rahul Gandhi over his new year message | ‘मोदी पंतप्रधान आहेत तोवर बिनधास्त...’, राहुल गांधींच्या ट्विटवरून भाजप नेत्यानं साधला जोरदार निशाणा

‘मोदी पंतप्रधान आहेत तोवर बिनधास्त...’, राहुल गांधींच्या ट्विटवरून भाजप नेत्यानं साधला जोरदार निशाणा

Next
ठळक मुद्देसोशल मीडिया यूझर्स तर, ही वर्षातली पहिली राजकीय लढाई असल्याचे म्हणत आहेत.सध्या राहुल गांधी इटलीमध्ये आहेत.काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इटलीतून जनतेला नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

नवी दिल्ला - नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी ट्विटरवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. सोशल मीडिया यूझर्स तर, ही वर्षातली पहिली राजकीय लढाई असल्याचे म्हणत आहेत. सध्या राहुल गांधी इटलीमध्ये आहेत. त्यांच्या या टूरवरूनच गिरिराज सिंहांनी व्यगात्मक निशाणा साधला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इटलीतून जनतेला नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. राहुल गांधी यांनी ट्विट करत लिहिले आहे, "नवे वर्ष सुरू होताना, ज्यांना आपण गमावले आहे त्यांची आठवण काढत आहोत. तसेच ज्यांनी आपले संरक्षण केले आणि बलिदान दिले त्या सर्वांचे आभार मानत आहोत. मी मान आणि सन्मानाने अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या शेतकरी आणि कामगारांसोबत आहे. सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा”. 

यानंतर, भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी राहुल गांधींचे हे ट्विट रिट्विट करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. गिरिराज सिंह ट्विट करत म्हणाले, “जोवर नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत, तोवर आपण बिनधास्त फिरू शकता आणि एन्जॉय करू शकता. पार्टी हार्ड”.

वर्षाच्या पहिल्याच दिवशी राहुल गांधी यांच्या ट्विटवर गिरिराज सिंहांची अशी प्रतिक्रिया पाहून, सोशल मीडिया यूझर्स कमेंट करत आहेत. अनेक लोकांनी, गिरिराज सिंहांच्या प्रतिक्रियेची तारिफ करत म्हणटले आहे, वर्षाच्या पहिल्या दिवशीतर सोडून द्या. तर अनेक युझर्स गिरिराज सिंहांना ट्रोलदेखील करत आहेत.

...तर देशातील ११ कोटी कुटुंबांना २० हजार रुपये मिळाले असते -
तत्पूर्वी, मोदी सरकारने या वर्षी 2378760000000 इतके कर्ज काही उद्योगपतींचे माफ केले आहे. कोरोना संकटाच्या कालावधीत याच पैशांचा वापर करून देशातील ११ कोटी कुटुंबांना २०-२० हजार रुपये देता आले असते. मोदीजींच्या विकासाचा हाच खरा चेहरा आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली होती. 

पंतप्रधान मोदींसंदर्भात राहुल गांधींचा 'ट्विटर पोल' - 
यापूर्वी आणखी एक ट्विट करत राहुल गांधी यांनी, मोदिंविरोधात एक ट्विटर पोल सुरू केला आहे. यासाठी त्यांनी चार पर्यायही दिले आहेत. यात, पहिला पर्याय - पीएम मोदी शेतकरी विरोधी आहेत, दुसरा पर्याय - पीएम मोदींना क्रोनी कॅपिटालिस्ट चालवत आहेत, तिसरा पर्याय - ते हट्टी आहेत, तर चौथा पर्याय - यांपैकी सर्व, असा आहे.

Web Title: BJP union minister Giriraj Singh on congress leader Rahul Gandhi over his new year message

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.