शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
3
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
4
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
5
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
6
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
7
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
8
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
9
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
10
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
12
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
13
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
14
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
15
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
16
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
17
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
18
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
19
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
20
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

भाजपला बहुमत मिळून नवा इतिहास की, बिगरकॉँग्रेस पक्षांच्या पराभवाची पुनरावृत्ती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 5:12 AM

उद्या निकाल : जगातील सर्वाधिक मोठ्या लोकशाहीच्या निवडणुकांच्या निकालाची उत्सुकता

- वसंत भोसले।लोकमत न्यूज नेटवर्कलोकसभेच्या सतराव्या निवडणुकांचा निकाल गुरुवारी जाहीर होत असून, त्याद्वारे नवा इतिहास घडणार, की इतिहासाची पुनरावृत्ती होणार, याचा फैसला होईल. कॉँग्रेसच्या वर्चस्वाखालील राजकारणात बिगरकॉँग्रेस पक्षांनी सहावेळा निवडणुका जिंकल्या. मात्र स्पष्ट बहुमतासह दुसऱ्यांदा सत्तेवर येऊन प्रथमच पाच वर्षे पूर्ण सत्ता राबविणाºया भाजपला मतदार पुन्हा सत्ता देऊन नवा इतिहास घडविणार का? याचा हा निकाल आहे.

सहा वेळा सत्तेवर आलेल्या कॉँग्रेसविरोधकांना दोनवेळा स्पष्ट बहुमत (१९७७ व २०१४) होते. जनता पक्षाच्या १९७७ मधील सरकारने पाच वर्षे पूर्ण केली नाही. प्रथमच सत्तेवर आलेले बिगरकॉँग्रेसी जनता सरकार अडीच वर्षात कोसळले. चारवेळा बिगरकॉँग्रेस पक्षांची सरकारे आली. त्यापैकी १९९९ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित राष्टÑीय लोकशाही आघाडीने कार्यकाळ पूर्ण केला.

२०१४ मध्ये कॉँग्रेसविरोधकांचे व भाजपचे स्वबळावरील सरकार स्पष्ट बहुमताच होते. पाच वर्षे पूर्ण केल्यानंतर भाजपला पुन्हा मतदारांनी बहुमत दिल्यास नवा इतिहास घडेल. तर पराभव झाल्यास बिगरकॉँग्रेस पक्षांच्या पराभवाची पुनरावृत्ती होईल. तोही विक्रमच असेल.

कॉँग्रेसने आजवर सोळापैकी दहा वेळा सरकार स्थापन केले. त्यापैकी सातवेळा पूर्ण बहुमत होते. कॉँग्रेस १९९१ मध्ये सर्वाधिक मोठा पक्ष होता, पण बहुमत नव्हते. छोटे पक्ष व अपक्षांची मदत घेऊन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना बहुमत सिद्ध करावे लागले. २००४ व २००९ मध्ये कॉँग्रेसला बहुमत मिळाले नाही. मात्र कॉँग्रेसच्या नेतृत्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडीकडे (युपीए) दहा वर्षे सत्ता होती. पंडित जवाहरलाल नेहरू (१७ वर्षे) आणि इंदिरा गांधी (१५ वर्षे) यांच्यानंतर सलग १० वर्षे सत्तेवर राहण्याचा मानही डॉ. मनमोहनसिंग यांना मिळाला. भाजपला संधी मिळाल्यास १० वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचा मान मोदी यांना मिळू शकतो. मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारमध्ये काही घटकपक्षांचे सदस्य मंत्रिमंडळात आहेत. पण भाजपकडे पूर्ण बहुमत असल्याने त्या पक्षाच्या विचारांचा या सरकारच्या कार्यपद्धतीवर खूप प्रभाव होता. त्या सरकारला पुन्हा कौल मिळणार का, याचा हा निकाल असणार आहे.

सहावेळा सत्ता गमाविलेल्या कॉँग्रेसने १९९६, १९९८ व १९९९ च्या निवडणुकांत पराभव स्वीकारत हॅट्ट्रिक केली होती. याउलट १९७७, १९८९ आणि २००४ मध्ये पुन्हा विजयी होत सरकार स्थापन केले होते. २०१४ च्या दारुण पराभवानंतर कॉँग्रेसला पुन्हा उभारी मिळणार का? घटकपक्षांच्या आधारे सरकार स्थापन करून कॉँग्रेसविरोधकांच्या पुन्हा सत्तेवर न येण्याच्या परंपरेची पुनरावृत्ती करणार का? याचाही फैसला गुरुवारी होईल.

कॉँग्रेसवा भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता धूसर असताना, राष्टÑवादी, तेलुगू देसम्, द्रविडीयन पक्ष, शिवसेना, अकाली दल, आप, जनता दल, बिजू जनता दल, तेलंगणा राष्टÑीय समिती, तृणमूल कॉँग्रेस, डावी आघाडी आदी प्रादेशिक पक्षांची कितपत मदत मिळणार आणि त्यांचा राष्टÑीय राजकारणात भाव वधारणार का, याचाही निकाल गुरुवारी लागेल. एकदा प्रादेशिक पक्षांनी पंतप्रधान निवडला होता आणि एकदा विरोधी पक्षनेत्याचे स्थान पटकाविले होते. दोनवेळा लोकसभेचे सभापतीपदही आघाडीच्या राजकारणात बळकावले. त्यामुळे त्यांना मिळणाºया यशावर कॉँग्रेस आणि भाजपचे भवितव्य अवलंबून असणार आहे.प्रादेशिक पक्षदुसºया स्थानावर !लोकसभेच्या आठव्या निवडणुकीनंतर (१९८४) प्रादेशिक पक्षांचे महत्त्व वाढले. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या त्यावर्षीच्या निवडणुकीत आंध्रातील तेलुगू देसमने लोकसभेच्या तीस जागा जिंकून दुसरे स्थान पटकाविले. यापूर्वी असे घडले नव्हते आणि नंतरही घडले नाही. कॉँग्रेस, जनता पक्ष, भाजप, डावे पक्ष, स्वतंत्र पक्ष आदी राष्ट्रीय पक्षांनाच विरोधी पक्षाचा मान मिळाला आहे. १९८४ मध्ये कॉँग्रेसला प्रचंड यश मिळाले. भाजपला दोनच, तर मार्क्सवाद्यांना २२ जागा मिळाल्या होत्या.सर्वात मोठा पक्षविरोधी बाकांवरलोकसभेतील सर्वाधिक जागा जिंकूनही विरोधी पक्षाच्या भूमिकेत राहण्याचे प्रसंग आजवर दोनदा आले. सदस्यसंख्येत तिसºया स्थानावर असलेला जनता दलाने १९९६ मध्ये सरकार स्थापन केले होते. त्यास दुसºया स्थानावरील कॉँग्रेस पक्षाचा पाठिंबा होता आणि सर्वाधिक जागा जिंकणारा भाजप विरोधी पक्ष होता. जनता दल - १९८९ (१४२), कॉँग्रेस (१९५), भाजप (८९), डावी आघाडी (५४) भाजप आणि डाव्या आघाडीच्या पाठिंब्यावर जनता दलाचे सरकार सत्तारूढ झाले होते. सर्वात मोठा पक्ष विरोधी पक्षाच्या भूमिकेत होता.

तिसºया क्रमांकाचापक्ष सत्तेत१९९६ साली कोणालाच स्पष्ट बहुमत मिळाले नाही. भाजप (१६१) सर्वात मोठा पक्ष विरोधी बाकावर होता. दुसºया क्रमांकावरील कॉँग्रेस (१४०) सरकारला बाहेरून पाठिंबा देत होता व केवळ ४६ जागा जिंकलेल्या जनता दलाने एच. डी. देवेगौडा यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. त्यांना डावी आघाडी व कॉँग्रेसचा पाठिंबा होता. डाव्यांमधील भारतीय कम्युनिस्ट पक्ष प्रथमच सत्तेतही सहभागी झाला. हे सरकार दीड वर्ष चालले. पैकी ११ महिने देवेगौडा, तर सात महिने गुजराल पंतप्रधानपदी होते. देवेगौडांना १९९७ साली स्वातंत्र्यदिनाचा सुवर्णमहोत्सवी समारंभ साजरा करण्याचा मान मिळाला.बहुमत वत्रिशंकू अवस्थाकॉँग्रेस : एकूण सातवेळा स्पष्ट बहुमत(१९५२, १९५७, १९६२, १९६७, १९७१, १९८०, १९८४)जनता पक्ष - एकदाच (१९७७)भाजप : एकदाच (२०१४)त्रिशंकू अवस्था : एकूण सातवेळा.(१९८९, १९९१, १९९६, १९९८, १९९९, २००४ आणि २००९)त्रिशंकू अवस्थेत सर्वात मोठा पक्ष कॉँग्रेस - चारवेळा(१९८९, १९९१, २००४, २००९)भाजप - तीनवेळा(१९९६, १९९८, १९९९)मुदतपूर्व निवडणुकालोकसभेची आताची निवडणूक सतरावी आहे. आजवर पाच वेळा मुदतपूर्व निवडणुका झाल्या आहेत.मुदतीप्रमाणे निवडणुका :एकूण अकरा (१९५७, १९६२, १९६७, १९७१, १९८४, १९८९, १९९६, २००४, २००९, २०१४, २०१९)मुदतपूर्व निवडणुका : एकूण चार (१९८०, १९९१, १९९८, १९९९)मुदतीनंतर : एकदाच (१९७७) - आणीबाणी लागू करून पाचव्या लोकसभेची मुदत (१९७१ मध्ये निवडलेली) एक वर्षाने वाढविली होती. हे सभागृह सहा वर्षे अस्तित्वात राहिले.मुख्य विरोधी पक्षलोकसभेतील मुख्य विरोधी पक्ष म्हणून दर्जा मिळण्यासाठी एकूण सदस्यांच्या दहा टक्के सदस्यसंख्या आवश्यक असते. आजवरच्या सोळापैकी आठवेळा अपुºया संख्याबळामुळे अधिकृत विरोधी पक्षच सभागृहात नव्हता. त्यामध्ये सर्वात मोठा पक्ष, वर्ष, सदस्यसंख्या पुढीलप्रमाणे...भारतीय कम्युनिस्ट : १९५२ (१६) १९५७ (२७), १९६२ (२९).स्वतंत्र पक्ष : १९६७ (४४)मार्क्सवादी पक्ष : १९७१ (२५)जनता पक्ष : १९८० (४१)तेलुगू देसम् : १९८४ (३०)कॉँग्रेस : २०१४ (४४)अधिकृतविरोधी पक्षलोकसभेत दहा टक्के जागा मिळून विरोधी पक्षाचा दर्जा मिळविलेल्यांचा प्रसंग आठ वेळा आला. कॉँग्रेसने सातवेळा हा मान पटकाविला आहे. तसेच स्पष्टपणे विरोधी पक्षाचा बहुमानही चारवेळा कॉँग्रेसने पटकाविला आहे. त्याचे वर्ष आणि मिळविलेल्या जागाकॉँग्रेस : १९७७ (१५३), १९९६ (१४२), १९९८ (१४१),१९९९ (११४).भाजप : १९९१ (१२०), २००४ (१३८), २००९ (११६).जनता दल : १९८९ (१४२)

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९