शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
2
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
3
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
4
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
5
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
6
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
7
पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव
8
नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत   
9
“डोळ्यांत पाणी, उद्ध्वस्त घरे, थंड पडलेले सरकार अन् शेतकऱ्यांचे दिवाळे”: विजय वडेट्टीवार
10
गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...
11
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
12
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
13
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
14
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
15
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
16
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
17
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
18
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
19
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या

जंगलातच...! तृणमूलचा नेता अन् भाजपची महिला नेता कारमध्ये दारू पित बसलेले; स्थानिकांनी पकडले तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 09:26 IST

BJP-TMC Liquor Party: पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी येथील रात्री उशिरा घडलेला हा प्रकार आहे. दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते दारुची पार्टी करत असल्याने आता वाद सुरु झाला आहे.

काही महिन्यांपूर्वी हायवेवरच कारमधून बाहेर येत एका राजकीय नेत्याचा महिलोसोबतचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा नेता आणि भाजपच्या महिला नेत्याचा जंगलात कारमध्ये बसून दारू पितानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. स्थानिकांनी बराच वेळ कार कोणाची उभी आहे हे पाहिले असता ही राजकीय भेसळपार्टी पाहून मोठा गोंधळ घातला. लोकांना भडकवून हे दोन पक्षांचे नेते मस्त पार्टी करत बसले होते. लोकांनी पाहताच तिने हळूच आपले ग्लास पुढच्या सीटवर सरकवले व दुसऱ्या गाडीत बसून हळून निघून गेली. नंतर तृणमूलच्या नेत्याची आणि त्याच्या चालकाची चांगलीच पंचायत झाली होती.  

पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी येथील रात्री उशिरा घडलेला हा प्रकार आहे. दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते दारुची पार्टी करत असल्याने आता वाद सुरु झाला आहे. सुनसान जंगलात बराच वेळ झाला कार उभी होती. ग्रामस्थांनी येता-जाता ही कार पाहिली आणि त्यांना संशय आला, म्हणून फोनाफोनी करून या कारकडे सगळे जमा झाले. त्यांनी कारमधून खाली उतरण्यास सांगितले, पाहिले तर भाजपा महिला मोर्चाची जलपाईगुडी जिल्हा अध्यक्षा दिपा बनिक अधिकारी त्या कारमध्ये बसलेली होती. तिच्यासोबत त्या कारमध्ये तृणमूल काँग्रेसचे नेते पंचायत समिति अध्यक्ष पंचानन रॉय हे देखील होते. 

ही परस्पर आणि कट्टर विरोधी राजकीय भेसळ पाहून ग्रामस्थांचे डोकेच सनकले. त्यांनी या घटनेचा व्हिडीओ बनविला आणि व्हायरल केला. या व्हिडिओनुसार महिला नेता दिपा या मागच्या सीटवर बसलेल्या होत्या. त्यांच्या हातात ग्लास होते, ग्रामस्थांनी पकडताच त्यांनी ते ग्लास पुढच्या सीटकडे सरकवले. कारमध्ये एक ड्रायव्हरही होता. त्याने काचा वर केल्या. यानंतर दिपा अधिकारी या कारमधून उतरल्या आणि मागून आलेल्या एका कारमध्ये बसून निघून गेल्या. ग्रामस्थांनी काही काळ टीएमसी नेता रॉय आणि त्याच्या चालकाला अडवून ठेवले होते. नंतर सोडून देण्यात आले. 

या प्रकारानंतर तिथून काढता पाय घेतलेल्या दिपा अधिकारी यांनी सांगितले की, हा आपल्याला अडकविण्यासाठी रचलेला सापळा होता. राजकीय कट होता. तर दुसरीकडे भाजपाने आणि टीएमसीने देखील यावर काही बोलण्यास नकार दिला आहे. दोन्ही पक्षांचे नेते या दारु पार्टीवर गप्प राहिले आहेत. 

टॅग्स :Trinamool Congressतृणमूल काँग्रेसBJPभाजपाcongressकाँग्रेसwest bengalपश्चिम बंगाल