शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

हिटलर दीदी; ममता बॅनर्जींवर भाजपाचा व्यंगचित्रातून निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 10:44 IST

सीबीआय विरुद्ध ममता वादावरुन भाजपाचे व्यंगबाण

लखनऊ: शारदा चिट फंड घोटाळ्याची चौकशी करण्यास गेलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांना बंगालमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलं. यामुळे मोठं रणकंदन माजलं. त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी धरणं आंदोलन सुरू केलं. यावरुन उत्तर प्रदेशभाजपानंममता बॅनर्जींवर ट्विट करुन निशाणा साधला. उत्तर प्रदेशभाजपानं ममता बॅनर्जी यांना हिटलरच्या रुपात दाखवलं आहे. ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये हिटलरशाही करत असल्याची टीका भाजपाकडून करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काही दिवसांपूर्वी रॅलीसाठी पश्चिम बंगालला जाणार होते. मात्र त्यांच्या हेलिकॉप्टरच्या लँडिंगला पश्चिम बंगाल प्रशासनानं परवानगी नाकारली. त्यावरुनही उत्तर प्रदेश भाजपानं ममतांवर व्यंगचित्राच्या माध्यमातून निशाणा साधला. आदित्यनाथ हेलिकॉप्टरमधून उतरण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र हेलिपॅडवर काटे असल्यामुळे त्यांचं हेलिकॉप्टर खाली उतरु शकत नाही, असं व्यंगचित्र भाजपानं ट्विटर हँडलवरुन प्रसिद्ध केलं आहे. 

तिसऱ्या व्यंगचित्रात सीबीआय अधिकारी एका पिंजऱ्यात दाखवले गेले आहेत. या पिंजऱ्याची चावी बंगाल पोलिसांच्या हातात आहे. 'देशातील जनता तुमची कृत्यं पाहते आहे हिटलर दिदी. तुम्हाला आणि तुमच्या महाआघाडीतील साथीदारांना जनता नाकारेल, यात शंका नाही,' अशा शब्दांमध्ये भाजपानं ममता यांना लक्ष्य केलं आहे. ममता बॅनर्जी यांनी गेल्याच महिन्यात कोलकात्यात देशातील 22 पक्षांच्या नेत्यांना एकत्र आणत एक मोठी सभा घेतली. यानंतर आता सीबीआय विरुद्ध ममता या संघर्षात जवळपास 20 पक्षांनी ममता यांना पाठिंबा दिला आहे. त्यावर भाजपानं व्यंगचित्राच्या माध्यमातून टीका केली आहे. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीCBIगुन्हा अन्वेषण विभागUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाyogi adityanathयोगी आदित्यनाथ