शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

UP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2018 08:42 IST

सर्व विरोधक एकत्र आल्यानं भाजपासमोर कडवं आव्हान

लखनऊ: कर्नाटकमध्ये एच. डी. कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्यात विरोधक एकत्र आले होते. 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांची तयारी सुरू असल्याचा संदेश यातून देण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर, विरोधक एकत्र आल्यास भाजपाचं काय होणार, याची लिटमस टेस्ट आज पश्चिम उत्तर प्रदेशातील कैराना लोकसभा मतदारसंघात होईल. कैराना मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीत भाजपाविरोधात बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष आणि काँग्रेस एकत्र आले आहेत. आज देशभरात लोकसभेच्या चार, तर विधानसभेच्या 10 जागांवर पोटनिवडणूक होत आहे. त्यापैकी कैरानामध्ये भाजपच्या म्रिगांका सिंह यांच्यासमोर राष्ट्रीय लोक दलाच्या तबस्सुम हसन यांचं आव्हान असेल. तबस्सुम यांना बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपा विरुद्ध इतर सर्व, अशी लढत याठिकाणी पाहायला मिळतेय. कर्नाटकमध्ये कुमारस्वामी यांच्या शपथविधीवेळी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव उपस्थित होते. विरोधकांनी दाखवलेली ही एकी भाजपासाठी किती अडचणीची ठरते, हे कैरानामध्ये स्पष्ट होईल. त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं कैरानामधील पोटनिवडणूक महत्त्वाची आहे. कैरानातील पोटनिवडणूक उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठीही अत्यंत प्रतिष्ठेची आहे. गोरखपूर आणि फुलपूर मतदारसंघांमध्ये मार्च महिन्यात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचा धुव्वा उडाला होता. त्यामुळे आदित्यनाथ यांच्या नेतृत्वावर  प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. भाजपाचे नेते हुकुम सिंह यांच्या निधनामुळे कैरानात पोटनिवडणूक होतेय. 31 मे रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.  

टॅग्स :kairanaकैरानाBJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथ