शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

CoronaVirus: “PM मोदी आहेत म्हणून देश वाचला, काँग्रेस असती तर काय झाले असते कुणास ठाऊक”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 10:48 IST

CoronaVirus: उत्तर प्रदेशचे भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी काँग्रेसवर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, म्हणून देश वाचला आहे, असे म्हटले आहे.

ठळक मुद्देPM मोदी आहेत म्हणून देश वाचलाकाँग्रेस असती तर काय झाले असते कुणास ठाऊकउत्तर प्रदेश भाजप प्रदेशाध्यक्षांचे टीकास्त्र

लखनऊ: कोरोना संकटाचे देशभरात थैमान सुरू आहे. दुसऱ्या लाटेचा प्रभाव अंशतः कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत असली, तरी कोरोनामुळे होणारे मृत्यू अद्यापही चिंतेत भर टाकणारे ठरत आहेत. अशातच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी मोठ्या प्रमाणात झडताना दिसत आहे. विरोध आणि सत्ताधारी पक्ष टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. उत्तर प्रदेशचे भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी काँग्रेसवर टीका करत पंतप्रधाननरेंद्र मोदी आहेत, म्हणून देश वाचला आहे, असे म्हटले आहे. (bjp swatantra dev singh says pm modi well handled corona situation in country)

स्वतंत्र देव सिंह यांनी एका पत्रकार परिषदेत सदर विधान केले आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदी आहेत म्हणून देश वाचला, काँग्रेस सत्तेत असती, तर काय झाले असते, याची कल्पना करवत नाही, अशी टीका त्यांनी केली. मात्र, यानंतर सोशल मीडियावर स्वतंत्र देव सिंह यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत असून, ते ट्रोलही झाल्याची माहिती मिळाली आहे. 

‘ब्लॅक फंगस’चा साथरोग कायद्यात समावेश करावा; केंद्राची नवी नियमावली

काँग्रेस एक नंबरचा खोटारडा पक्ष

कोरोना संकटाच्या काळात रुग्णांना कशा प्रकारे मदत पोहोचवायची, लाभ मिळवून द्यायचे, यासाठी पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ उत्तम प्रकारे काम करत आहेत. परिस्थिती हाताळत आहेत. काँग्रेस हा एक नंबरचा खोटारडा पक्ष आहे. सर्वांना आता हे माहिती झाले आहे. पंतप्रधान मोदी आहेत म्हणून देश वाचला आहे, काँग्रेस असती तर काय झाले असते कुणास ठाऊक, असे स्वतंत्र देव सिंह यावेळी बोलताना म्हणाले.

“ना ढासळलेल्या अर्थव्यवस्थेची, ना चीनच्या घुसखोरीची; मोदी सरकार कसलीच जबाबदारी घेत नाही”

पंतप्रधान मोदींची संकटात संधी 

स्वतंत्र देव सिंह पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ अनेक आघाड्यांवर लढत आहेत. आव्हान, संकटाचे रुपांतर संधीत करण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून केले जात आहेत. समाजाचा सहयोग त्यांना मिळत आहे. गाव, गरीब आणि शेतकरी बंधू या संकटातून कसे वाचतील, हे मोठे आव्हान असल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे, स्वतंत्र देव सिंह यांना अशा वक्तव्यामुळे मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाyogi adityanathयोगी आदित्यनाथ