शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
7
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
8
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
9
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
10
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
11
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
13
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
14
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
15
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
16
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
17
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
18
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
19
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

देश भक्त चौकीदार...! लग्नपत्रिकेवर मोदींचा फोटो, यंदाही समर्थकांकडून असा प्रचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 13:19 IST

लोकसभा निवडणूक २०२४ चे सर्वत्र वारे वाहत आहे.

Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणूक २०२४ चे सर्वत्र वारे वाहत आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघ्या काही दिवसांचा कालावधी उरला असताना राजकीय पक्ष जोमाने प्रचाराला लागले आहेत. उमेदवार आपल्या प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर करत असतात. अशातच एका लग्न पत्रिकेचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. राजस्थानमधील जयपूरमध्ये एका लग्नपत्रिकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छापण्यात आला असून यावर ४०० पारचा नारा देखील लिहिण्यात आला आहे. २०१९ मध्ये देखील अशी पत्रिका पाहायला मिळाली होती, ज्यावर 'देश भक्त चौकीदार', असा आशय लिहिण्यात आला होता.

संबंधित नवरदेवाच्या वडिलांच्या सांगण्यावरून मुलाची लग्नपत्रिका अशा शैलीत छापण्यात आल्याचे कळते. खरं तर या आधी देखील अशा प्रकारच्या लग्नपत्रिका समोर आल्या आहेत. विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, समर्थक या माध्यमातून प्रचार करून सर्वांचे लक्ष वेधत असतात. २०१८ मध्ये देखील अशा प्रकारची एक लग्नपत्रिका व्हायरल झाली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात नरेंद्र मोदी यांचे फोटो पत्रिकांवर झळकले होते. हा ट्रेन्ड २०२४ च्या निवडणुकीत देखील पाहायला मिळत आहे. 

लग्नपत्रिकेवर मोदींचा फोटो दरम्यान, लग्न पत्रिकेत प्रामुख्याने गणपती, छत्रपती शिवाजी महाराज आणि आपली श्रद्धा असलेल्या देव-देवतांचे फोटो लोक छापत असतात. पण, अनेकांनी लग्नपत्रिकेद्वारे राफेल विमानाचा सौदा आणि स्वच्छ भारत मिशनलाही पाठिंबा दिला होता. आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये पाहायला मिळते की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

मागील लोकसभा निवडणुकीत एका जोडप्याने त्यांच्या लग्नपत्रिकेत नरेंद्र मोदी यांच्या नेतृ्त्वातील सरकारच्या योजनांची यादी छापली होती. यासोबतच एक भेट म्हणून मोदींना पुन्हा एकदा निवडून आणण्याचे आवाहन करण्यात आले. २०२३ मध्ये तेलंगणा येथील तरूणाने लग्नपत्रिकेत मोदी आणि स्थानिक खासदार संजय कुमार यांचा फोटो छापला होता. तर एकाने लग्नपत्रिकेच्या माध्यमातून राफेल विमानाचे महत्त्व सांगितले होते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाSocial Viralसोशल व्हायरलmarriageलग्न