शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

CoronaVirus: “ना ढासळलेल्या अर्थव्यवस्थेची, ना चीनच्या घुसखोरीची; मोदी सरकार कसलीच जबाबदारी घेत नाही”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 15:47 IST

CoronaVirus: भाजप खासदाराने केंद्रातील मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

ठळक मुद्देसुब्रमण्यम स्वामींचा भाजपला घरचा अहेरकेंद्रातील मोदी सरकारवर साधला निशाणा

नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक देशभरात कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. नवीन कोरोनाबाधितांची संख्या घटताना दिसत असली, तरी कोरोनामुळे होणारे मृत्यू वाढत आहेत. कोरोना संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळत चालल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे चीनच्या कुरघोड्याही अधूनमधून सुरू आहेत. या तिहेरी संकटाशी लढत असताना भाजप खासदाराने केंद्रातील मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. केंद्रातील मोदी सरकार कसलीच जबाबदारी घेत नसल्याची टीका करण्यात आली आहे. (bjp subramanian swamy criticised modi govt over collapsing economy and china intrusion)

भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधताना दिसत आहेत. अनेक मुद्द्यांवरून ते सरकारला घरचा आहेर देत आहेत. आता कोलमडत जात असलेली अर्थव्यवस्था आणि लडाख भागात चीनची सुरू असलेली घुसखोरी यांवरून स्वामी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. याप्रकरणी स्वामी यांनी एक ट्विट केले आहे. 

मस्तच! आता Ration Card नसेल तरीही मिळणार मोफत धान्य; सरकारचा दिलासा

मोदी सरकार कसलीच जबाबदारी घेत नाही

सन २०१६ पासून कोलमडत चाललेल्या अर्थव्यवस्थेची जबाबदारी कुणीही घेतलेली नाही. तसेच लडाख भागात चीनकडून होत असलेली घुसखोरी थांबवण्यात अपयश आल्याबाबत कुणीही जबाबदारी घेतली आहे. एवढेच नव्हे तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी उपाययोजना न करण्याबाबत जबाबदारी घेतली, असे सांगत मोदी सरकार कसलीच जबाबदारी घेत नसल्याची टीका सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. 

ऐकावं ते नवलच! संकटापासून बचावासाठी थेट कोरोना देवीची स्थापना; धोका कमी होत असल्याचा दावा

भारत एकटा पडण्याच्या स्थितीत 

आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या घडामोडी सूरू असून, अमेरिका आणि रशिया यांनी आपापसातील वितुष्ट मिटवले असून, लवकरच याची घोषणा केली जाईल. याला चीननेही समर्थन दिले असून, भारत आता एकटा पडण्याच्या स्थितीत आहे, असा दावा करत हवे असेल, तर आपल्या परराष्ट्रमंत्र्यांना विचारा, असे स्वामी यांनी म्हटले आहे. 

Corona Vaccine वर नागरिकांची शंका; ‘या’ देशाने जाळले तब्बल २० हजार डोस!

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात २ लाख ७६ हजार ०७० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर, दिलासादायक बाब म्हणजे याच कालावधीत देशात ३ लाख ६९ हजार ७७ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. गेल्या २४ तासांत ३,८७४ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसEconomyअर्थव्यवस्थाindia china faceoffभारत-चीन तणावSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण