शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

अर्थमंत्र्यांनी 'देवाची करणी' म्हणताच लोकांनी देव शोधला; अवधूत वाघांचं 'ते' ट्विट पुन्हा व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 15:17 IST

कोरोना म्हणजे देवाची करणी; अर्थमंत्री निर्मला सीतारामन सोशल मीडियावर ट्रोल

मुंबई: भारतीय अर्थव्यवस्थेला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. आधीच अडचणीत असलेली भारताची अर्थव्यवस्था कोरोनामुळे आणखी संकटात सापडली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेसमोरील समस्यांवर बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोनाला 'देवाची करणी' म्हटलं. कोरोनाला थेट देवाची करणी म्हणणाऱ्या सीतारामन सोशल मीडियावर ट्रोल झाल्या आहेत. कोरोनाला देवाची करणी म्हटल्यानं सीतारामन यांची अनेकांनी खिल्ली उडवली आहे. जवळपास सहा महिन्यांपूर्वी देशात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून देशाचा जीडीपी घसरला आहे. जीएसटीमधून सरकारला अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचं आकडेवारीतून अनेकदा समोर आलं आहे. मग ही सगळी पण देवाची करणीच आहे का? आणि असेल तर मग कोणत्या देवाची? असे सवाल सीतारामन यांना सोशल मीडियावरून विचारले जात आहेत.

सीतारामन यांना 'देवाची करणी' विधानावरून लक्ष्य करताना अनेकांनी भाजपाचेच प्रवक्ते अवधूत वाघ यांच्या ट्विटचा आधार घेतला आहे. त्यामुळे वाघ यांनी दोन वर्षांपूर्वी केलेलं ट्विट अचानक चर्चेत आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विष्णूचे ११ वे अवतार असल्याचं ट्विट अवधूत वाघ यांनी १२ ऑक्टोबर २०१८ रोजी केलं होतं. त्यांचं हे ट्विट आता व्हायरल झालं आहे. कोरोना देवाची करणी आणि पंतप्रधान मोदी विष्णूचे अवतार यांचा संबंध सोशल मीडियावर अनेकांनी जोडला आहे.
काय म्हणाल्या निर्मला सीतारामन?काल वस्तू आणि सेवा कर परिषदेची बैठक झाली. त्यानंतर सीतारामन यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी कोरोनाचा उल्लेख 'देवाची करणी' असा केला. 'कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसू शकतो, असं सीतारामन म्हणाल्या. यावेळी त्यांनी राज्यांना दोन पर्याय दिले. 'आरबीआयशी सल्लामसलत करून राज्यांना उचित व्याज दरानं ९७ हजार कोटी रुपये दिले जाऊ शकतात. या पैशाची सेस कलेक्शनच्या माध्यमातून ५ वर्षांनी परतफेड केली जाऊ शकते,' असा पहिला पर्याय त्यांनी दिला. 'या पूर्ण वर्षातील जीएसटीची परतफेडीतील तफावत आरबीआयचा सल्ला घेऊन उधारीच्या माध्यमातून पूर्ण केली जाऊ शकते,' असा दुसरा पर्यायदेखील त्यांनी सुचवला. 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्या