शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेच्या पेपरमध्ये काश्मीर पाकचा तर अरुणाचलला दाखवलं चीनचा हिस्सा, भाजपाचा पं.बंगाल सरकारवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 11:16 IST

भारतीय जनता पार्टीनं पश्चिम बंगालमधील माध्यमिक शाळेतील परीक्षेच्या एका पेपरमध्ये भारताचा नकाशा चुकीचा दाखवल्याचा आरोप करत तृणमूल काँग्रेस सरकारवर निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली - भारतीय जनता पार्टीनं पश्चिम बंगालमधील माध्यमिक शाळेतील परीक्षेच्या एका पेपरमध्ये भारताचा नकाशा चुकीचा दाखवल्याचा आरोप करत तृणमूल काँग्रेस सरकारवर निशाणा साधला आहे.  'टीएमसी टीचर्स असोसिएशनकडून जारी करण्यात आलेल्या परीक्षांच्या पेपरमध्ये काश्मीरला पाकिस्तानचा आणि अरुणाचल प्रदेशला चीनचा हिस्सा दाखवण्यात आले आहे', असे भाजपाचे म्हणणे आहे.  हा पेपर 10 इयत्तेतील विद्यार्थ्याचा आहे. संबंधित परीक्षा पेपर पश्चिम बंगाल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशनतर्फे जारी करण्यात आला आहे, असा आरोप भाजपानं केले आहे.  

भाजपाचे राहुल सिन्हा यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की, ''टीएमसीला नेमके काय हवंय? त्यांना देशाची विभागणी करायची का?.  जे सैनिक काश्मीर व अरुणाचल प्रदेशात देशवासियांच्या सुरक्षेसाठी आपल्या जिवाची बाजी लावत आहेत, हा त्यांचा अपमान आहे. यावेळी त्यांनी शिक्षणमंत्र्यांना पदावरुन तातडीनं हटवण्यात यावं, अशी मागणीदेखील केली आहे. शिवाय, काँग्रेस व टीएमसीनं याप्रकरणी माफी मागवी, अशीही मागणी केली आहे.  

तर दुसरीकडे, या प्रकरणासंदर्भात मनुष्यबळ विकास मंत्रालयाला पत्र लिहून, सोबत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणार, असे बंगालमधील  भारतीय जनता पार्टीचे जनरल सेक्रेटरी राजू बॅनर्जी यांनी सांगितले आहे. दरम्यान, अशा प्रकारे भारताचा नकाशा चुकीच्या पद्धतीनं सादर केल्याप्रकरणी गदारोळ झाल्याचे हे पहिलेच प्रकरण नाहीय. यापूर्वीही देशाचा चुकीचा नकाशा दाखवल्याप्रकरणी राजकीय वातावरण गरम झाल्याचे पाहायला मिळाले आहे.  

 

 

टॅग्स :IndiaभारतBJPभाजपाJammu Kashmirजम्मू काश्मिरArunachal Pradeshअरुणाचल प्रदेशMamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदी