शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आडनाव उधार घेऊन कोणी गांधी होऊ शकत नाही; भाजपाचा राहुल गांधींवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 15:22 IST

राहुल गांधींनी माफी मागण्यास नकार दिल्यावर भाजपाची जोरदार टीका

नवी दिल्ली: भारत बचाओ रॅलीला संबोधित करताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी रेप इन इंडिया विधानाबद्दल माफी मागण्यास स्पष्ट शब्दांमध्ये नकार दिला. माझं नाव राहुल सावरकर नाही, तर राहुल गांधी आहे. त्यामुळे कदापि माफी मागणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले. त्यावरुन आता भाजपा नेत्यांनी राहुल यांनी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी राहुल गांधीवर टीका केली आहे. राहुल यांनी आडनाव उधार घेतलं आहे, अशा शब्दांमध्ये त्यांनी जोरदार पलटवार केला आहे. राहुल यांच्या विधानाला गिरीराज सिंह यांनी ट्विटमधून प्रत्युत्तर दिलं. 'वीर सावरकर खरेखुरे देशभक्त होते. आडनाव उधार घेऊन कोणी गांधी होत नाही, कोणी देशभक्त होऊ शकत नाही. देशभक्त होण्यासाठी धमन्यांमध्ये शुद्ध हिंदुस्तानी रक्त असायला हवं. वेश बदलून अनेकांनी देशाला लुटलं आहे. मात्र आता तसं होणार नाही. हे तीनजण कोण आहेत? हे तिघे देशाचे सामान्य नागरिक आहेत का?,' असे प्रश्न उपस्थित करताना गिरीराज यांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सोनिया गांधींचा फोटो ट्विट केला आहे.  राहुल गांधींनी देशातील वाढत्या बलात्कारांच्या घटनांवरुन झारखंडमधील सभेतून पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला होता. मोदी म्हणाले होते मेक इन इंडिया. मात्र जिथे पाहावं तिथं रेप इन इंडिया दिसत आहे, अशा शब्दांमध्ये राहुल यांनी मोदींना लक्ष्य केलं होतं. त्यावरुन काल संसदेत गदारोळ झाला. राहुल यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली. मात्र राहुल यांनी माफी मागण्यास नकार दिला.  गेल्या काही दिवसांपासून ईशान्य भारत धगधगतो आहे. आर्थिक मंदी, बेरोजगारीचे प्रश्न आ वासून उभे आहेत. यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी भाजपाकडून वाद निर्माण केला जात आहे. मात्र मी माझ्या विधानावर ठाम आहे. त्यामुळे माफी मागणार नाही, असं म्हणत राहुल यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींनी दिल्लीचा उल्लेख रेप कॅपिटल असा केला होता, याची आठवणदेखील त्यांनी करुन दिली. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा