शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला धक्का : आसाम सरकारमधून ‘अगप’ बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 05:40 IST

नागरिकत्व विधेयकावरील संसदीय समितीचा अहवाल लोकसभेत

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून आसाम गण परिषदने (अगप) आम्ही आसाममधील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमधून (रालोआ) बाहेर पडत असल्याची घोषणा सोमवारी केली. हे नियोजित विधेयक मागे घ्यावे हे सरकारला पटवून देण्यात अगपने निर्वाणीचे केलेले प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर थेट सरकारमधूनच बाहेर पडण्याचा निर्णय परिषदेने घेतला.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची येथे भेट घेतल्यानंतर परिषदेचे अध्यक्ष अतुल बोरा म्हणाले की, हे विधेयक आसाम कराराच्याविरोधात आहे आणि सध्या सुरू असलेले नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्स (एनआरसी) अद्ययावत करण्याचे काम वाया जाईल हे केंद्र सरकारला पटवून देण्याचा आम्ही प्रयत्न केला. परंतु, राजनाथ सिंह यांनी आम्हाला हे विधेयक उद्या लोकसभेत संमत होईल हे स्पष्टपणे सांगितले आहे. यानंतर आघाडीमध्ये राहण्याचा कोणताच प्रश्न उरला नाही, असे ते म्हणाले. १२६ सदस्यांच्या राज्य विधानसभेत भाजपाचे ६१ आमदार असून बोडोलँड पीपल्स फ्रंटच्या १२ आमदारांचा व एकमेव अपक्ष आमदाराचा आघाडीला पाठिंबा आहे. अगपचे १४ आमदार आहेत. अतुल बोरा यांच्यासह तीन मंत्री आहेत.

आज सभागृहात चर्चानागरिकत्व दुरुस्ती विधेयक २०१६ तयार झाले आहे. त्यावरील संयुक्त संसदीय समितीचा अहवाल लोकसभेत सोमवारी मांडण्यातआला. या विधेयकावर मंगळवारी सभागृहात चर्चा होणे अपेक्षित आहे. धार्मिकतेच्या आधारावर भारतीय नागरिकत्व देणे ही राज्यघटनाविरोधी व चुकीची कृती आहे, असे मत या समितीने बहुमताने व्यक्त केले आहे.काय आहे प्रकरण?च्अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकिस्तानमधील जे हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चनधर्मीय स्थलांतरित होऊन भारतात आले आहेत आणि त्यांच्या वास्तव्याला सहा वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, अशांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी १९५५ च्या नागरिकत्व कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार आहे.च्आतापर्यंत हा वास्तव्याचा कालावधी १२ वर्षांचा धरण्यात येतो. तो कमी करून व अशा लोकांकडे पुरेशी कागदपत्रे नसतानाही त्यांना नागरिकत्व बहाल करण्याची तरतूद या विधेयकात आहे. तसे आश्वासन भाजपाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दिले होते.ईशान्य भारतात आज बंदगुवाहाटी : नागरिकत्व दुरुस्ती विधेयक २०१६ च्या निषेधार्थ ईशान्य भारताच्या सातही राज्यांतील अनेक विद्यार्थी संघटनांनी उद्या, मंगळवारी बंद पुकारला आहे.मिझो झिरलाई पवाल (एमझेडपी), दी आॅल अरुणाचल प्रदेश स्टुडंटस् युनियन (आपसू), नागा स्टुडंटस् फेडरेशन, आॅल आसाम स्टुंडटस् युनियन (आसू) यांनी ११ तासांचा बंद पाळण्याचे ठरविले आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपा