शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या छोले भटुऱ्यांमुळे भाजप सावध; उपोषणाआधी नेते, कार्यकर्त्यांसाठी सूचनांची जंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2018 17:09 IST

उपोषणाचा फज्जा उडू नये यासाठी भाजप नेते लागले कामाला

नवी दिल्ली: अॅट्रॉसिटीच्या मुद्यावरुन मोदी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेसकडून एक दिवसाचं उपोषण करण्यात आलं होतं. मात्र या उपोषणाआधी काँग्रेस नेते छोले भटुरे खात असल्याची छायाचित्रं समोर आली आणि भाजपनं काँग्रेसवर निशाणा साधला. आता काँग्रेससारखी नामुष्की आपल्यावर ओढवू नये, यासाठी भाजपचे नेते कामाला लागले आहेत. संसदेच्या अधिवेशनाचा वेळ वाया गेल्यानं भाजपचे खासदार उद्या उपोषण करणार आहेत. मात्र काँग्रेसच्या उपोषणाप्रमाणे आपल्याही उपोषणाचा फज्जा उडू नये, यासाठी भाजपचे नेते सावध झाले आहेत. काँग्रेसमुळेच अधिवेशनाचा अमूल्य वेळ वाया गेला, असा भाजपचा आरोप आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार उद्या दिल्लीत उपोषण करणार आहेत. या उपोषणाचा फज्जा उडू नये, यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून सर्व खासदार आणि कार्यकर्त्यांना विशेष सूचना करण्यात आल्या आहेत. 'सार्वजनिक ठिकाणी खाणं टाळा. उपोषणाला येण्याआधी काही खात असाल, तर त्यावेळी फोटो काढू नका,' अशा सूचना नेते आणि कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. काँग्रेसचे अजय माकन, अरविंदर सिंग लवली आणि हारुन युसूफ उपोषणाआधी छोले भटुरे खात होते. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर भाजप नेत्यांनी काँग्रेसचं उपोषण म्हणजे स्टंट असल्याची टीका केली होती. त्यामुळेच आता भाजपचे नेते उपोषणाआधी सावध झाले आहेत. भाजपच्या दिल्लीतील खासदार मीनाक्षी लेखी, डॉ. हर्षवर्धन यांनी पक्ष कार्यकर्त्यांना सार्वजनिक ठिकाणी खाणं टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय खाताना छायाचित्रं काढू नका, अशीही सूचना करण्यात आली आहे. उपोषणस्थळी खाद्यपदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांना बसू देऊ नका, असे आदेशही 'वरुन' देण्यात आले आहेत. उपोषणाचा फज्जा उडू नये, यासाठी भाजपकडून ही काळजी घेण्यात येत आहे.  

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी