शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या वरिष्ठांनीही मध्यस्थीचे प्रयत्न केले, योगींच्या आजी-माजी मंत्र्यांचा अखेर घटस्फोट; 10 वर्षांपासून बिनसलेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 10:50 IST

राजकारण जसे बदलत जाईल तसे ते एकत्र येत पुन्हा वेगळे होत होते. दोघांमधील वाद कोणापासून लपून राहिले नव्हते.

उत्तर प्रदेशमध्ये एक राजकीय दृष्ट्या हाय प्रोफाईल असलेल्या आजी माजी मंत्र्यांचा घटस्फोट झाला आहे. योगी सरकारमध्ये परिवाहन मंत्री दयाशंकर सिंह आणि आधीच्या सरकारमधील माजी मंत्री स्वाती सिंह यांचे २२ वर्षांचे नाते संपुष्टात आले आहे. या दोघांमधील वाद मिटविण्यासाठी भाजपाच्या वरिष्ठ मंत्र्यांनीही मध्यस्थीचे प्रयत्न केले होते. परंतू, अखेर या दोघांचा घटस्फोट झाला आहे. 

गेल्या दहा वर्षांपासून दोघांमध्ये बिनसलेले होते. दयाशंकर आणि स्वाती यांचे लग्न १८ मे २००१ ला झाले होते. परंतू १२ वर्षांतच दोघांमध्ये बिनसले होते. यामुळे दोघांमधील वाद कोणापासून लपून राहिले नव्हते. गेली १० वर्षे ते पती-पत्नी जरूर होते पण वेगवेगळे राहत होते. राजकारण जसे बदलत जाईल तसे ते एकत्र येत पुन्हा वेगळे होत होते. 

स्वाती यांनी २०१२ मध्येच घटस्फोटसाठी दावा दाखल केला होता. परंतू तो फेटाळण्यात आला होता. आता २०२२ मध्ये पुन्हा अर्ज केला होता. तो माघारी घेऊन नवीन याचिकाच दाखल केली होती. कौटुंबिक न्यायालयात अनेकदा बोलवूनही दयाशंकर आले नाहीत यामुळे स्वातीच्या साक्षीदारांचा जबाब घेऊन कोर्टाने घटस्फोटाचा निर्णय दिला आहे. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दयाशंकर मुलांना अधून मधून भेटत असतात. 

मायावतींनी एक केले...गेल्या दशकभरापासून दोघे वेगळे झाले आहेत. दयाशंकर यांनी मायावतींविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते, तेव्हा त्यांच्या मदतीला स्वाती आल्या होत्या. या काळात पुन्हा त्यांच्यात चांगले संबंध बनले होते. परंतू २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत दयाशंकर यांना तिकीट न देता स्वाती यांना दिल्याने पुन्हा बिनसले होते. स्वाती या योगी सरकारमध्ये मंत्री झाल्या. पाच वर्षांनी दयाशंकर यांनी स्वाती यांचे तिकीट कापले आणि आपण मंत्री झाले. स्वाती यांनी या काळात अनेकदा मारहाणीचे आरोप केले आहेत. या दोघांमध्ये भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी अनेकदा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाDivorceघटस्फोट