शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

राज्यसभेत बहुमत मिळविण्यासाठी भाजप आतुर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 4:46 AM

राज्यसभेत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी संसदेच्या इतिहासात आजवर कधीही ऐकिवात नव्हती अशी पद्धत शोधून भाजप विरोधी पक्षाच्या राज्यसभा सदस्यांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : राज्यसभेत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी संसदेच्या इतिहासात आजवर कधीही ऐकिवात नव्हती अशी पद्धत शोधून भाजप विरोधी पक्षाच्या राज्यसभा सदस्यांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी प्रयत्न करीत आहे. २४५ सदस्य असलेल्या राज्यसभेत भाजपचे संख्याबळ ७८ आहे. स्वबळावर बहुमत प्राप्त करण्यासाठी भाजपला २०२० पर्यंत वाट पाहावी लागेल; परंतु तोवर महत्त्वाची विधेयके मंजूर करून घेण्यासाठी सबुरीने घेण्यास भाजप तयार नाहीत.तेलगू देसमचे सहापैकी ४ खासदार भाजपत सामील झाले आहेत. समाजवादी पार्टीचे खासदार नीरज शेखर हेही राजीनामा देत भाजपमध्ये दाखल झाले आहेत. भाजप त्यांना पुन्हा उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर आणणार आहे. उत्तर प्रदेशात भाजपचे ३२५ आमदार असल्याने शेखर यांना पुन्हा राज्यसभेवर निवडून आणणे भाजपला सहज शक्य आहे. पुढल्या आठवड्यात निवडणूक आयोग कधीही राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी अधिसूचना जारी करण्याची दाट शक्यता आहे.समाजवादी पार्टी आणि बसपाचे आणखी दोन संसद सदस्य राजीनामा देतील आणि या दोन जागांसाठी स्वतंत्रपणे पोटनिवडणूक घेतली जाईल, असे समजते. दोन्ही खासदार नोव्हेंबर २०२० मध्ये निवृत्त होणार आहेत. राज्यसभेवर पुन्हा निवडून आणण्यासोबत त्यांना २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याचा विचार केला जाईल, असा सांगावा भाजपने त्यांना धाडला आहे.संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची मुदत वाढविली जाऊ शकते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.राज्यसभेतील संख्याबळ याचवर्षी शंभरीपार नेण्याचा भाजपचा मनोदय आहे. मित्रपक्ष, तीन नामनियुक्त सदस्य तसेच समर्थकांमुळे राज्यसभेत भाजपने कामचलाऊ बहुमत मिळविले आहे. बिजू जनता दल (७), वायएसआर काँग्रेस (२), जेडीएसच्या एका सदस्यांच्या पाठिंब्यामुळे भाजपच्या बाजूने १२४ खासदार आहेत.>महाराष्टÑ, आसाम, बिहारकडेही लक्षयाशिवाय उत्तर प्रदेश, आसाम, बिहार आणि महाराष्टÑ आणि अन्य राज्यांतील विरोधी पक्षांच्या काही राज्यसभा सदस्यांचेही मन वळविण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. ते भाजपमध्ये सामील झाल्यानंतर त्यांची पुन्हा राज्यसभेवर वर्णी लावून भाजपला राज्यसभेत महत्त्वाची विधेयके संमत करणे सोपे होईल.