शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

"हिंमत असेल तर उन्नावमधून निवडणूक लढवा"; भाजपा नेत्याचं राहुल-प्रियंका गांधींना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 19:57 IST

साक्षी महाराज यांनी आता काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

उत्तर प्रदेशातील उन्नावचे खासदार साक्षी महाराज हे नेहमीच त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. साक्षी महाराज यांनी आता काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना जाहीर आव्हान दिलं आहे

उन्नावचे खासदार साक्षी महाराज यांनी मीडियाशी संवाद साधताना राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियंका गांधी यांना आव्हान दिलं. "प्रियंका गांधी किंवा राहुल गांधी, हिंमत असेल तर त्यांनी माझ्यासोबत उन्नावमध्ये येऊन निवडणूक लढवावी" असं म्हटलं आहे.

उन्नावची जनता आपल्यासोबतच असल्याचं ते स्पष्टपणे सांगतात. त्यामुळे काँग्रेसचा कोणताही मोठ्यातला मोठा नेता मग त्या प्रियंका गांधी असो वा राहुल गांधी, उन्नावमध्ये येऊन त्यांच्यासोबत निवडणूक लढवू शकतात असं त्यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी होत असलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांबाबत इंडिया आघाडीमध्ये सध्या गदारोळ सुरू आहे. 

एकीकडे मध्य प्रदेशात गेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या सपा उमेदवारांसमोर काँग्रेसने आपले उमेदवार उभे केल्याने समाजवादी पक्ष संतापला आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्यात शाब्दिक युद्ध रंगताना दिसत आहे. याच दरम्यान, आता साक्षी महाराज यांनी काँग्रेस नेत्यांना जाहीर आव्हान दिलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Sakshi Maharajसाक्षी महाराजRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधीBJPभाजपा