शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Video: 'त्या' ऐतिहासिक चुकीला पंडित नेहरूच जबाबदार; भाजपाकडून व्हिडीओ केला जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 10:59 IST

काश्मीर प्रकरण स्वत: जवाहरलाल नेहरूंनी हाताळले. काश्मीर प्रकरणी यूएन जाण्याची सर्वात मोठी चूक पंडित जवाहरलाल नेहरूंनी केल्याचा दावा भाजपाने केला आहे.

नवी दिल्ली - भाजपानेकलम 370 हटविण्याला एक महिना पूर्ण झाल्याच्या मुहुर्तावर एक शॉर्ट फिल्म प्रकाशित केली आहे. पक्षाचे कार्याध्यक्ष जे.पी नड्डा यांनी बुधवारी हा लघुपट प्रसिद्ध केला. ज्यात जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविण्याचा निर्णय आणि दोन केंद्रशासित प्रदेशाचं विभाजन याचा उल्लेख केला आहे. 

हा व्हिडीओ पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लाल किल्ल्यावरील भाषणाने सुरू होतो. तर व्हिडीओचा शेवटची मोदींच्या भाषणाने केला जातो. 11 मिनिटाच्या या व्हिडीओत देशातील पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. काश्मीरमधील स्थितीसाठी नेहरूंना दोषी ठरवत त्यांची ऐतिहासिक चूक यासाठी जबाबदार आहे असं सांगितलं जातं. व्हिडीओनुसार त्यावेळी कलम 370 वरुन बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी सरकारच्या निर्णयाचा विरोध केला होता. 

भाजपाचं म्हणणं आहे की, त्याकाळी 562 संस्थांना सरदार वल्लभभाई पटेल यांनी शांततापूर्ण भारतात विलीन केलं होतं. मात्र काश्मीर प्रकरण स्वत: जवाहरलाल नेहरूंनी हाताळले. काश्मीर प्रकरणी यूएन जाण्याची सर्वात मोठी चूक पंडित जवाहरलाल नेहरूंनी केल्याचा दावा भाजपाने केला आहे. तसेच राज्याला विशेष दर्जा देऊन दुसरी चूक केली. या निर्णयाला तत्कालीन काँग्रेस नेत्यांनीही विरोध केला होता. 

व्हिडीओनुसार त्याकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूंना सांगितले होते की, कलम 370 हा देशाचा विश्वासघात आहे. याचा मसुदा बनविण्यासाठी त्यांनी विरोध केला होता. या शॉर्ट फिल्ममध्ये अमित शहा यांनी संसदेत कलम 370 हटविण्याचा निर्णयाचा उल्लेख करण्यात आला आहे. 

केंद्रातील मोदी सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी ऐतिहासिक निर्णय घेतला. त्याअंतर्गत जम्मू-काश्मीरला लडाखपासून वेगळं करण्यात आलं आहे. लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा बहाल करण्यात आला असून, तिथे विधानसभेची स्थापन करण्यात आलेली नाही. लडाखच्या लोकांनी गेल्या अनेक वर्षांपासून लडाख हा केंद्रशासित प्रदेश व्हावा, अशी मागणी केली होती. 

राज्यसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर ते लोकसभेत मंजुरीसाठी मांडण्यात आले होते. अशा पद्धतीने विधेयक का मांडले गेले याबाबत आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माहिती दिली होती.  लोकसभेत आधी विधेयक मांडले असते तर राज्यसभेत त्यावर मोठा गोंधळ होण्याची भीती होती. त्यामुळे ते आधी राज्यसभेत मांडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अमित शहा यांनी दिली आहे. 

टॅग्स :Jawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूBJPभाजपाAmit Shahअमित शहाJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370