शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Rafale Deal: मोदी सरकारवरील 'ग्रहण' दूर करण्यासाठी मराठमोळ्या अभिनेत्रीचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 22:28 IST

राफेल खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राहुल गांधींनी अनेकदा केला आहे

मुंबई: राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वारंवार विरोधकांकडून केला जात आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी अनेकदा राफेल खरेदीवरुन मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे 'स्वच्छ कारभारा'चा दावा करणारं मोदी सरकार अडचणीत आलं आहे. यामधून सरकारची सुटका करण्यासाठी आता मराठमोळी अभिनेत्री पल्लवी जोशी सरसावली आहे. काही दिवसांपूर्वीच 'ग्रहण' मालिकेत दिसलेली अभिनेत्री पल्लवी जोशी आता मोदी सरकारवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांचं ग्रहण दूर करण्यासाठी पुढे आली आहे. भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये पल्लवी जोशी राफेल डील सोप्या शब्दांमध्ये सांगताना दिसत आहेत. यासाठी तिनं सोसायटीच्या सिक्युरिटी सिस्टीमचं उदाहरण दिलं आहे. 'सोसायटीच्या सिक्युरिटी सिस्टमसाठी आधीच्या सचिवांनी फ्रेंच कंपनीशी बोलणी केली होती. 10 वर्षांपासून ही बोलणी सुरू होती. या काळात सिक्युरिटी सिस्टिमसाठी वापरण्यात आलेलं तंत्रज्ञान जुनं झालं,' असं पल्लवी जोशी या व्हिडीओतून सांगते आहे. 'आधीच्या सचिवांनी ज्या लॉकसाठी बोलणी केली होती, त्यात सुटे भाग, देखभाल यांचा समावेशच नव्हता. मी सोसायटीची नवीन सचिव असल्यानं थेट फ्रेंच कंपनीच्या प्रमुखांशी बोलणी केली. मी त्यांच्याशी नवा करार केला. यामधून अनेक अनुकूल गोष्टी घडल्या. नव्या सुविधा मिळाल्या. विशेष म्हणजे यातील काही लॉक भारतात तयार केली जाणार होती,' असं सांगत पल्लवी जोशीनं राफेल करार आणि मेक इन इंडियाचं महत्त्वदेखील अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण व्यवहार आधीच्या सचिवांपेक्षा कमी किमतीत केल्याचं सांगत काँग्रेसच्या तुलनेत भाजपा सरकारनं जनतेचा पैसा वाचवला, असंही सांगण्याचा प्रयत्न अप्रत्यक्षपणे पल्लवीनं केला आहे. या करारामुळे देशाचे 12 हजार 500 कोटी रुपये वाचले, असं जोशींनी व्हिडीओच्या अखेरीस म्हटलं आहे. 

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलNarendra Modiनरेंद्र मोदीPallavi Joshiपल्लवी जोशीBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस