भाजपाध्यक्ष अमित शहांची नवी टीम जाहीर, वरूण गांधीना वगळले

By Admin | Updated: August 16, 2014 19:08 IST2014-08-16T13:47:17+5:302014-08-16T19:08:55+5:30

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली असून त्यात युवा चेह-यांना स्थान देण्यात आले असले तरी वरूण गांधी यांना वगळण्यात आले आहे.

BJP released Amit Shah's new team, Varun Gandhi dropped out | भाजपाध्यक्ष अमित शहांची नवी टीम जाहीर, वरूण गांधीना वगळले

भाजपाध्यक्ष अमित शहांची नवी टीम जाहीर, वरूण गांधीना वगळले

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. १६ - भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी  भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली असून त्यात युवा चेह-यांना स्थान देण्यात आले आहे. मात्र या टीममधून भाजप नेते वरूण गांधी यांना वगळण्यात आले असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून भाजपमध्ये प्रवेश करणा-या राम माधव यांना महासचिव पद देण्यात आले आहे. 
या टीममध्ये ११ उपाध्यक्ष व ८ महासचिव असून हिमाचल प्रदेशातील भाजप नेते जेपी नड्डा व राजीव प्रताप रूडी यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. श्याम जाजू व पूनम महाजन यांना सचिव बनवण्यात आले आहे. विनय सहस्त्रबुद्धेंची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून  विजया रहाटकर यांच्याकडे महिला मोर्चाचे अध्यक्षपद सोपवण्यात आले आहे. 
शाह यांची टीम खालीलप्रमाणे : 
उपाध्यक्ष -
गारू दत्रे (तेलंगण), बी.. एस. येडियुरप्पा (कर्नाटक), सत्यपाल मलिक (उत्तर प्रदेश), मुख्तार अब्बास नक्वी (उत्तर प्रदेश)
पुरुषोत्तम रुपाला (गुजरात), प्रभात झा (मध्य प्रदेश), रघुवर दास (झारखंड), किरण माहेश्वरी (राजस्थान), विनय सहस्त्रबुद्धे (महाराष्ट्र), रेणू देवी (बिहार), दिनेश शर्मा
 
महासचिव - 
जगत प्रकाश नड्डा (हिमाचल प्रदेश), राजीव प्रताप रुडी (बिहार), राम माधव (तेलंगण), सरोज पांडे (छत्तीसगड), राम शंकर कटारिया (उत्तर प्रदेश), राम लाल (दिल्ली)
 
जॉईंट सेक्रेटरी  
वी. सतीश (कर्नाटक), शौदन सिंह  (छत्तीसगड), शिव प्रकाश (उत्तर प्रदेश), बीएल संतोष (कर्नाटक)
 
सचिव-
श्याम जाजू (महाराष्ट्र), अनिल जैन (दिल्ली), एच राजा  (तामिळनाडू), रोमेन डेका (आसाम), सुधा यादव (हरियाणा), पूनम महाजन (महाराष्ट्र), रामविचार नेतम (छत्तीसगड), अरूण सिंह (उत्तर प्रदेश),सिद्धार्थ नाथ सिंह (उत्तर प्रदेश), सरदार आर पी सिंह (दिल्ली), श्रीकांत शर्मा (उत्तर प्रदेश), ज्योदित ध्रुव (मध्य प्रदेश), तरूण चुघ (पंजाब), रजनीश कुमार (बिहार)
 
 

 

Web Title: BJP released Amit Shah's new team, Varun Gandhi dropped out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.