शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

'भाजपाध्यक्ष नड्डांचा दावा खोटा, एम्स रुग्णालयाची एक वीटही उभारली नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 08:29 IST

भाजपाध्यक्षांच्या विधानानंतर या दोन्ही खासदारांनी थोप्पूर येथे उभारण्यात येणाऱ्या एम्सच्या साईटला भेट दिली

नवी दिल्ली - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी एका कार्यक्रमात बोलताना तमिळनाडूतील मदुरै येथे एम्सचे काम 95 टक्के पूर्ण झाले आहे. लवकरच येथील रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र, भाजप अध्यक्षांनी केलेला हा दावा खोटा असल्याचे काँग्रेस खासदाराने म्हटल. विशेष म्हणजे खासदार बी. मानिकम टैगोर यांनी घटनास्थळी जाऊन हा दावा खोटा ठरवला आहे. त्यांच्यासमवेत मदुरैचे खासदार सु. वेंकटेशन हेही यावेळी हजर होते.

भाजपाध्यक्षांच्या विधानानंतर या दोन्ही खासदारांनी थोप्पूर येथे उभारण्यात येणाऱ्या एम्सच्या साईटला भेट दिली. त्यावेळी, हातात फ्लेक्स घेऊन मदुरै एम्स रुग्णालयाची इमारत कोठे आहे? असा सवालही उपस्थित केला. जेपी नड्डांनी 95 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा केला होता. मग, ती 95 टक्के काम पूर्ण झालेली एम्सची इमारत कोठे केली? असा प्रश्न विचारत दोन्ही खासदारांनी भाजपाध्यक्षांचं विधान धादांत खोटं असल्याचं दाखवून दिलं. आम्ही जागेवर जाऊन तब्बल १ तास पाहणी केली. पण, आम्हाला तेथे काहीही सापडलं नाही, असे म्हणत खासदार मनिकम टॅगौर यांनी फोटोही ट्विट केले आहेत.  सु. वेंकटेशन यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भातील फोटोही शेअर केले आहेत. तसेच, अद्याप येथील एम्स रुग्णालयाची निविदाही निघाली नाही, त्याला कॅबिनेटची मंजुरीही मिळाली नाही. मात्र, भाजप अध्यक्ष नड्डा यांनी केलेले विधान आश्चर्यकारक असल्याचं वेंकटेशन यांनी म्हटलं आहे. तसेच, मदुराई एम्स रुग्णालयासाठी 1200 कोटी रुपयांचे काम होते, ते आता 1900 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे, या कामाचे टेंडरच निघाले नाही. सध्या येथील जागेवर काहीही उभारण्यात येत नसल्याचे दिसत आहे, असेही वेंकटेशन यांनी स्पष्ट केलं. 

टॅग्स :BJPभाजपाJ P Naddaजगत प्रकाश नड्डाMember of parliamentखासदारAIIMS hospitalएम्स रुग्णालय