शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा स्थापना दिवस : पक्ष कार्यकर्त्यांनी आज एक वेळच्या जेवणाचा त्याग करावा, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 13:48 IST

'कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या जागतीक संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने देशाचे नेतृत्व करत आहेत, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. यासंकटातून बाहेर पडण्यासाठी संपूर्ण जग मोदींकडे मोठ्या आशेने पाहत आहे,” असेही नड्डा म्हणाले.

ठळक मुद्देभारतीय जनता पक्ष आज आपला 40वा स्थापना दिवस साजरा करता आहेपक्षाच्या 40व्या स्थापना दिना निमित्त सर्व कार्यकर्त्यांनी 40 जणांची संपर्क साधावानाड्डा यांनी मानले पोलीस कर्मचारी, डॉक्टर, सफाई कर्मचारी, बँक आणि पोस्ट ऑफिसच्या कर्मचाऱ्यांचे आभार

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्ष आज आपला 40वा स्थापना दिवस साजरा करता आहे. या निमित्ताने पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांनी कार्यकर्त्यांना काही सूचनाही दिल्या आहेत. तसेच 'पक्ष कार्यकर्त्यांनी आजच्या दिवस एक वेळच्या जेवणाचा त्याग करावा आणि लॉकडाऊनच्या काळात ज्यांना कष्ट सोसावे लागले त्यांच्या प्रति सहानुभूती व्यक्त करावी,' असे आवाहन केले आहे. 

'कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या जागतीक संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने देशाचे नेतृत्व करत आहेत, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. यासंकटातून बाहेर पडण्यासाठी संपूर्ण जग मोदींकडे मोठ्या आशेने पाहत आहे,” असेही नड्डा म्हणाले.

पक्षाच्या 40व्या स्थापना दिना निमित्त सर्व कार्यकर्त्यांनी 40 जणांची भेट घ्यावी आणि त्यांना पीएम केयर्स फंडात 100 रुपये दान करण्याचे आवाहन करावे, असेही नड्डा यांनी कार्यकर्त्यांना सागितले. यावेळी नड्डा यांनी कोरोनासारख्या कठीन परिस्थितीतही आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचारी, डॉक्टर, सफाई कर्मचारी, बँक आणि पोस्ट ऑफिसचे कर्मचारी आदिंचेही आभार मानले. 

जे लोक क्वारंटीनमध्ये आहेत त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधून त्यांची हिम्मत वाढवायची आहे. तेसच पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही यशस्वीपणे पक्षाची वाटपाच करू, असेही नड्डा म्हणाले.  यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करत, “संपूर्ण भारत देश कोरोना संकटाचा सामना करत असातानाच आज आपल्या पक्षाचा 40 वा स्थापनादिवस आहे. मी भाजपा कार्यकर्त्यांना आवाहन करतो, की त्यांनी पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. तसेच गरजूंची मदत करवी आणि सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करा, चला भारत कोरोनामुक्त करूया,' असे म्हटले आहे.

जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी 6 एप्रिल 1980 रोजी भारतीय जनता पक्षाची स्थापना केली. यानंतर हा पक्ष आणीबाणीनंतर 1977ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत इंदिरागांधींच्या विरोधात मैदानात उतरला होता.

टॅग्स :BJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्याIndira Gandhiइंदिरा गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस