शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

'केजरीवाल, उद्धव ठाकरे, शरद पवार अन्...', या नेत्यांना अटक होणार; राघव चड्ढांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 17:52 IST

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आल्यामुळे आप नेते आक्रमक झाले आहेत.

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. यामुळे आम आदमी पार्टी भाजपवर सातत्याने टीका करत आहे. अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकून भाजप दिल्लीच्या 7 जागा आपल्या खिशात घालण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका आप नेते आणि खासदार राघव चढ्ढा यांनी केली आहे.

'या नेत्यांना अटक होणार...'

माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, अरविंद केजरीवालांना समन्स आले, आता पुढची बारी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची असेल. हेमंत सोरेन यांच्यानंतर राजदचे तेजस्वी यादव यांना बिहारमध्ये अटक केली जाईल. हे इथेच थांबणार नाही, यानंतर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांनाही अटक होईल. त्यानंतर सीएम पिनराई विजयन, तामिळनाडूमध्ये सीएम स्टॅलिन, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांनाही अटक केली जाईल. 

प्रत्येक राज्यांतील प्रमुख नेत्यांना अटक करून भाजपला लोकसभेच्या जागा जिंकायच्या आहेत. राजकीय पक्ष आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना अशा प्रकारे अटक केल्यास लोकशाहीचा पायाच डळमळीत होईल. भाजपला पराभवाची भीती आहे, त्यामुळे त्यांना एकट्यानेच शर्यतीत उतरायचे आहे. विरोधी आघाडीच्या प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकून भाजपला जागा जिंकायच्या आहेत, अशी टीकाही चड्ढा यांनी यावेळी केली. 

'भाजपला पराभवाची भीती'

राघव चढ्ढा पुढे म्हणतात, इंडिया आघाडीचा उमेदवार निवडणूक लढला तर भाजपच्या जागा कमी होतील. यामुळे भाजपला पराभवाची भीती वाटू लागली आहे. एखादा नेता तुरुंगात असेल तर तो निवडणूक लढवू शकणार नाही, त्यामुळे भाजप विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकण्याचे प्रयत्न करत आहे. या योजनेअंतर्गत भाजप केजरीवाल यांना अटक करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपचे पुढील लक्ष 14 लोकसभा जागा असलेल्या झारखंडवर आहे. या सर्व जागांवर भाजपची अवस्था वाईट आहे, त्यामुळेच ते हेमंत सोरेन यांना अटक करू शकतात.

95% विरोधी नेत्यांवर गुन्हे दाखल2014 पासून केंद्रीय एजन्सींनी नोंदवलेल्या 95% केसेस विरोधी नेत्यांच्या विरोधात आहेत. गेल्या काही वर्षांत विरोधी पक्षनेत्यांवर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. निवडणुकीपूर्वी भाजप त्यांची पिळवणूक करते. या नेत्यांनी शरणागती पत्करली नाही तर निवडणुकीच्या आसपास त्यांना अटक केली जाते. या देशात एक पक्ष आणि एकच नेता ठेवणे, हेच भाजपचे उद्दिष्ट आहे. अशाने देशाची लोकशाही धोक्यात येईल, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय