शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'दुष्ट, धर्मविरोधी, रामविरोधी; राहुल गांधी नव्या युगातील रावण', भाजपची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 17:59 IST

भाजपने सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर केले असून, यात राहुल गांधी यांना रावणाच्या रुपात दाखवले आहे.

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक जवळ येत आहे, त्यामुळे भाजप-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दरम्यान, आज(गुरुवारी) भाजपने काँग्रेस नेते राहुल गांधी यांची थेट रावणाशी तुलना केली. भाजपने सोशल मीडिया हँडलवर एक पोस्टर शेअर केले, ज्यात राहुल गांधी यांना रावणाच्या रुपात दाखवण्यात आले आहे. 

फोटो शेअर करत भाजपने 'नव्या युगातील रावण. तो दुष्ट आहे, धर्माविरुद्ध आहे, रामाच्या विरोधात आहेत, देश नष्ट करणे, हेच त्याचे एकमेव ध्येय आहे,' असे कॅप्शनही दिले आहे. भाजपने शेएअर केलेल्या पोस्टरमध्ये भारत धोक्यात आहे, असे लिहिले आहे. तसेच, इंग्रजीत A CONGRESS PARTY PRODUCTION DIRECTED BY GEORGE SOROS, असेही लिहिले आहे.

भाजपने राहुल यांना सोरोसशी का जोडले?काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे'मध्ये जॉर्ज सोरोसचे लोक सहभागी झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. याशिवाय भाजप नेत्यांनी ‘ओपन सोसायटी फाऊंडेशन’, या स्वयंसेवी संस्थेचे नाव घेत काँग्रेसवर निशाणा साधला. भाजप नेत्यांचा दावा आहे की, या एनजीओला अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांनी निधी दिला आहे आणि त्याचे उपाध्यक्ष सलील शेट्टी काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे'मध्ये सहभागी झाले होते.

जॉर्ज सोरोस यांची पीएम मोदींवर टीकाजॉर्ज सोरोस अमेरिकन अब्जाधीश आहेत. सोरोस यांनी 8 महिन्यांपूर्वी म्युनिक सुरक्षा परिषदेत म्हटले होते की, भारत हा लोकशाही देश आहे, पण पंतप्रधान मोदी लोकशाहीवादी नाहीत. ते मोठे नेते होण्याचे मुख्य कारण म्हणजे, मुस्लिमांवर केलेला हिंसाचार. सोरोस यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा, म्हणजेच CAA आणि काश्मीरमधून कलम 370 हटवण्यावरुनही पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. 

घमंडिया फाइल्सचा चौथा भाग रिलीज दरम्यान, भाजपने आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन 'घमांडिया फाइल्स' नावाचा चौथा एपिसोड जारी केला आहे. यात भाजपने पश्चिम बंगालमध्ये सत्तेत असलेल्या टीएमसीवर निशाणा साधला आहे. 'टीएमसीच्या राजवटीत बंगालमध्ये निवडणुका जिंकण्यासाठी लोकशाहीचे तुकडे केले जातात, मारहाण, खून आणि बलात्काराच्या माध्यमातून गावोगावी टीएमसी कार्यकर्त्यांची दहशत पसरवली जाते, अशी टीका भाजपने केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारणlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक