शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi : "मंत्र्याची हकालपट्टी न करून भाजपाने न्याय प्रक्रियेत अडथळा आणला"; राहुल गांधींचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 12:17 IST

Congress Rahul Gandhi And Lakhimpur Kheri Violence : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.

नवी दिल्ली - लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात (Lakhimpur Kheri Violence) आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय गृह राज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला अनेक प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत, तसेच चौकशीला तो सहकार्य़ करत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. आशिष मिश्राची (Ashish Mishra) 12 तास चौकशी करण्यात आली. यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. 

राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "मंत्र्याची हकालपट्टी न करून भाजपाने न्याय प्रक्रियेत अडथळा आणला आहे. केंद्र सरकारला ना शेतकऱ्यांच्या कुटुंबांची काळजी आहे, ना हत्या झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांची" असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच KisanKoNyayDo हा हॅशटॅग देखील वापरला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे. "नेतागिरी म्हणजे फॉर्च्यूनरने कोणालाही चिरडून टाकणे नाही" असं स्वतंत्र देव सिंह (BJP Swatantra Dev Singh) यांनी म्हटलं आहे.

"नेतेगिरी म्हणजे कोणालाही लुटणे नाही"

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह हे अल्पसंख्यांक आघाडीच्या कार्यकारिणीत बोलत होते. "नेतेगिरी म्हणजे कोणालाही लुटणे नाही. फॉर्च्युनरने कुणालाही चिरडायला आलेलो नाही. तुम्हाला तुमच्या वर्तनामुळेच मते मिळतील. तुम्ही राहता त्या परिसरात जर दहा लोकांनी तुमची स्तुती केली तर माझी छाती रुंद होईल" असं म्हटलं आहे. तसेच "लोकांचे प्रेम तुम्हाला नेता बनवते. आम्ही राजकारणात लुबाडण्यासाठी किंवा कुणालाही फॉर्च्यूनरने चिरडण्यासाठी आलेलो नाही. फक्त तुमच्या वागण्याने मते मिळणार आहेत" असा सल्ला देखील स्वतंत्र देव सिंह यांनी दिला आहे. 

"शेतकऱ्यांना चिरडणारी ती थार कार आमची"

काही महिन्यांपूर्वी अजय मिश्रा टेनी यांनी कारबाबत महत्त्वाची कबुली दिली आहे. "शेतकऱ्यांना चिरडणारी ती कार आमचीच" असल्याचं म्हटलं आहे. "पहिल्या दिवसापासून आम्ही म्हणतोय की शेतकऱ्यांना चिरडणारी ती थार कार आमची आहे. ती आमच्या नावाने नोंदणीकृत आहे. ही कार काही कार्यकर्त्यांना घेऊन कोणाला तरी आणण्यासाठी जात होती. त्यावेळी माझा मुलगा दुसऱ्या ठिकाणी होता. तो सकाळी अकरा ते संध्याकाळपर्यंत दुसऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करत होता. माझा मुलगा आशिष मिश्रा घटनास्थळी नाही तर कार्यक्रमस्थळी उपस्थित होता, तिथे हजारो लोक होते. त्याचे तिथले फोटो आणि व्हिडीओ देखील आहेत. जर तुम्हाला त्याचा कॉल रेकॉर्ड आणि सीडीआर, लोकेशन जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही सर्व काही तपासू शकता. हजारो लोक आशिष मिश्रा कार्यक्रमात होते, असा जबाब देण्यास तयार आहेत" असं अजय मिश्रा यांनी एनडीटीव्हीशी बोलताना म्हटलं आहे. 

आणखी वाचा

"नेतागिरी म्हणजे फॉर्च्यूनरने कोणालाही चिरडून टाकणे नाही"; लखीमपूरवरून भाजपा नेत्याचा सल्ला

भयंकर! ...अन् वेगाने आलेल्या मंत्र्याच्या कारने शेतकऱ्यांना चिरडलं; अंगावर काटा आणणारा नवा Video व्हायरल

 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारFarmerशेतकरीBJPभाजपा