भाजपाला आत्मचिंतनाची गरज डिचोली तालुका
By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:10+5:302015-03-20T22:40:10+5:30
डिचोली : डिचोली तालुक्यातील दोन जागा भाजपाने पटकावल्या असल्या तरी दोन मोक्याच्या जागांवर भाजपाला पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे संघटनात्मक कार्य, सरकारच्या विविध भूमिका व एकूणच कार्यपद्धतीबाबत भाजपाला आत्मपरीक्षणाची गरज निर्माण झाली आहे.

भाजपाला आत्मचिंतनाची गरज डिचोली तालुका
ड चोली : डिचोली तालुक्यातील दोन जागा भाजपाने पटकावल्या असल्या तरी दोन मोक्याच्या जागांवर भाजपाला पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे संघटनात्मक कार्य, सरकारच्या विविध भूमिका व एकूणच कार्यपद्धतीबाबत भाजपाला आत्मपरीक्षणाची गरज निर्माण झाली आहे.मये व कारापूर मतदारसंघात उपसभापती अनंत शेट यांनी दोन्ही जागांवर विजय संपादन करताना अडीच हजारांची आघाडी घेत सन्मानजनक यश मिळवले.कारापूर-सर्वण मतदारसंघातून अंकिता न्हावेलकर यांचा विजय झाला, तर मये मतदारसंघातून शंकर चोडणकर विजयी झाले. शंकर चोडणकरांच्या विरोधात सात उमेदवार रिंगणात होते. तरीदेखील त्यांना मते मिळाली. मये मतदारसंघात उपसभापती शेट यांचीच चलती आहे, याची ग्वाही देणारी आहे. अतिशय शांत स्वभाव व गाजावाजा न करता आपले काम करून जनतेच्या सतत संपर्कात राहताना कार्यकर्त्यांना आपल्या मर्जीत राखण्यात शेट यांना यश आले आहे.काँग्रेसने पक्षीय पातळीवर रिंगणात उतरण्याचे टाळलेले असले तरी त्यांनी डिचोली व पाळीत अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दिला. या दोन्ही मतदारसंघात भाजपाच्या विरोधातील सर्वच लोक एकवटले. डिचोलीतून अपक्ष आमदार नरेश सावळ यांनी शरद शेटये यांना पूर्ण पाठिंबा देताना त्यांच्या विजयासाठी अविरत प्रयत्न केले. त्यांना अनेक घटकांनी साथ दिली. या मतदारसंघात प्रचाराच्या दौर्यात शाब्दिक युद्धही पाहायला मिळाले. भाजपाने कल्याणकारी योजना राबवलेल्या असल्या तरी काही गोष्टी जनतेला खटकल्यामुळेच भाजपा उमेदवाराला येथे पराभव स्वीकारावा लागला आहे. खुद्द काही भाजपावाल्यांनीच प्रचारात असहकाराचे धोरण हाती घेतल्याने त्याचा फटका भाजपाला बसला आहे. एकंदर भाजपाला यातून बोध घेऊन आत्मचिंतनाची गरज बनली आहे.तुळशीदास गावकर यांनी भाजपाने उमेदवारी डावलल्याने अपक्ष रिंगणात उतरून ८८० मते घेतली. त्यामुळे भाजपाच्या पराभवात त्यांची ............ ....................(प्रतिनिधी)