शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

PM मोदींच्या अपमानाची आठवण, भाजपानं सुनावलं; जे.पी नड्डांचं खरगेंना खरमरीत पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 10:56 IST

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राहुल गांधींवरील टीकेवरून पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं होते. त्याला भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

नवी दिल्ली - देशाच्या राजकारणात सध्या काँग्रेस आणि भाजपा यांच्यात 'लेटर'वॉर सुरू झालं आहे. राहुल गांधी यांनी आरक्षणावरून केलेल्या विधानावरून भाजपा नेते आक्रमक झाले. त्यानंतर राहुल गांधींच्या टीकेवरून काँग्रेस  अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवून प्रश्नांचा भडीमार केला. आता खरगे यांच्या पत्रावर भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी प्रत्युत्तर देत पत्र पाठवलं आहे.

नड्डा यांनी त्यांच्या पत्रात म्हटलंय की, राहुल गांधी यांनी वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान केला. तितकेच नाही तर सोनिया गांधी यांनी मोदींसाठी मौत का सौदागर या शब्दाचा वापर केला. काँग्रेस नेत्यांनी मागील १० वर्षात पंतप्रधान मोदींना ११० हून अधिक शिव्या दिल्या. ज्या व्यक्तिचा इतिहास देशातील पंतप्रधानांसह पूर्ण ओबीसी समुदायाला चोर म्हणून संबोधण्याचा आहे, पंतप्रधानांसाठी अत्यंत आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्याचा आहे, ज्याने संसदेत पंतप्रधानांना काठीने मारण्याची भाषा केली त्यांच्या मानसिकतेबाबत देशाला माहिती आहे अशा राहुल गांधींना योग्य ठरवण्याचा प्रयत्न तुम्ही कोणत्या मजबुरीतून करत आहात असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

तसेच काँग्रेस कॉपी अँन्ड पेस्टवाला पक्ष बनला आहे. मागील १० वर्षात पंतप्रधानांबद्दल काँग्रेस नेत्यांनी शिव्यांचा वापर केला. दुर्दैव म्हणजे त्यात काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाचाही समावेश होता. मग त्यावेळी राजकीय संस्कृती, मर्यादा, शिस्त, शिष्टाचार यासारख्या शब्दांचा तुमच्या आणि काँग्रेस पक्षाच्या शब्दकोशातून गायब होता का? असा सवाल करत जे.पी नड्डा यांनी राहुल गांधी यांच्या मोहब्बत की दुकान याचा उल्लेख केला. स्वार्थी सत्तेत बुडालेली काँग्रेस पार्टी कथित मोहब्बत की दुकान असं जे प्रोडेक्ट विकत आहे, जातीयवादी विष पेरत आहे. वैमनस्या वाढवत आहे. देश तोडण्याचं काम करतेय असा आरोपही केला. 

काय म्हणाले होते मल्लिकार्जुन खरगे?

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं होते. त्यात केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टूसह इतर नेत्यांविरोधात ज्यांनी राहुल गांधींवर टीका केली त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. या नेत्यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर आक्षेपार्ह आणि हिंसक विधाने केली. भाजपा नेत्यांच्या या विधानावर काँग्रेसनं चिंता व्यक्त केली होती. भविष्यासाठी हे घातक आहे असं खरगे म्हणाले. 

टॅग्स :J P Naddaजगत प्रकाश नड्डाMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी