शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

...तर लवकरच भारत भाजपामुक्त होईल; बड्या नेत्याकडून भाजपाला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 15:26 IST

मोदींचे सल्लागार त्यांना चुकीची माहिती देतात; भाजपा नेत्याचं शरसंधान

नवी दिल्ली: झारखंडमधील पराभवामुळे भाजपाच्या गोटात चिंतेचं वातावरण असताना पक्षाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामींनी घरचा आहेर दिला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची अवस्था अतिशय वाईट आहे. आर्थिक आघाडीवर वेळीच योग्य पावलं उचलली न गेल्यास देश भाजपामुक्त होईल, असा इशारा स्वामींनी भाजपा नेतृत्त्वाला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सल्लागार त्यांना अंधारात ठेवत असल्याचंदेखील स्वामींनी म्हटलं आहे. 'अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी प्रयत्न न केल्यास भारत भाजपामुक्त होईल. मोदींचे सल्लागार कोण आहेत याबद्दल मला माहिती नाही. मात्र ते त्यांना सत्य परिस्थिती सांगत नाहीत. मोदींना अंधारात ठेवण्याचं काम त्यांच्या सल्लागारांकडून सुरू आहे', अशा शब्दांत स्वामींनी स्वत:च्याच सरकारवर टीका केली. झारखंडमधील पराभवाच्या पार्श्वभूमीवर स्वामींनी मोदी सरकारला लक्ष्य केलं. काल झारखंड विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. राज्यात विधानसभेच्या एकूण ८१ जागा आहेत. यापैकी केवळ २५ जागा जिंकण्यात भाजपाला यश आल्यानं त्यांना सत्ता गमवावी लागली. तर झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दलाच्या महाआघाडीनं ४७ जागा जिंकल्या. झारखंड मुक्ती मोर्चानं ३०, काँग्रेस १६, तर राष्ट्रीय जनता दलानं एक जागा जिंकली. झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन राज्याचे मुख्यमंत्री होतील. त्यांनी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत दोन्ही ठिकाणी विजय संपादन केला आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJharkhandझारखंडBJPभाजपाSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामी