भाजपाचे खासदार तरुण विजय दगडफेकीत गंभीर जखमी

By Admin | Updated: May 21, 2016 06:15 IST2016-05-21T06:15:49+5:302016-05-21T06:15:49+5:30

भारतीय जनता पार्टीचे उत्तराखंडचे राज्यसभा सदस्य तरुण विजय हे पोखरी खेड्यात शुक्रवारी काही लोकांनी केलेल्या दगडफेकीत गंभीर जखमी झाले.

BJP MP Tarun Vijay seriously injured in stone pelting | भाजपाचे खासदार तरुण विजय दगडफेकीत गंभीर जखमी

भाजपाचे खासदार तरुण विजय दगडफेकीत गंभीर जखमी


डेहराडून : भारतीय जनता पार्टीचे उत्तराखंडचे राज्यसभा सदस्य तरुण विजय हे पोखरी खेड्यात शुक्रवारी काही लोकांनी केलेल्या दगडफेकीत गंभीर जखमी झाले.
चकराता येथे दलितांचा छळ आणि मंदिरात त्यांना प्रवेश नाकारण्याच्या विरोधात तरुण विजय यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन यात्रा काढण्यात आली होती. यादरम्यान सिलगुड देवता मंदिरात दलितांना प्रवेश देत असताना तरुण विजय यांच्यावर दगडफेक झाली, असे सांगण्यात येते. यात त्यांचे काही समर्थकही जखमी झाले. तरुण विजय आणि अन्य जखमींना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: BJP MP Tarun Vijay seriously injured in stone pelting