शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 15:33 IST

BJP MP Sudhanshu Trivedi: 'काँग्रेस सरकारने शरियाला संविधानापेक्षा वर ठेवले. ते मागास दलित, वंचित आणि शोषितांचे आरक्षण खाऊ इच्छितात.'

BJP MP Sudhanshu Trivedi: भाजप खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी वक्फच्या मुद्द्यावरुन इंडिया आघाडीवर निशाणा साधला. राजद नेते तेजस्वी यादव यांच्या वक्फ सुधारणा कायद्यावरील टीकेला उत्तर देताना त्रिवेदी म्हणाले, 'बाबासाहेबांच्या संविधानाची खिल्ली उडवली जात आहे. हाच राम मनोहर लोहिया, जयप्रकाश यांचा समाजवाद होता का? भाजप आणि जेडीयू समाजवादाच्या बाजूने उभे आहेत. तर, आरजेडी आणि सपा सारखेपक्ष नमाजवादाच्या बाजूने उभे आहेत. त्यांचे सरकार आले तर ते शरिया लागू करतील. हे लोक दहशतवाद्यांना संरक्षण देणारे आहेत.'

हा मुल्ला मौलवींचा नमाजवादसुधांशू त्रिवेदी पुढे म्हणतात, 'काँग्रेस सरकारने शरियाला संविधानापेक्षा वर ठेवले होते. याद्वारे ते मागास दलित, वंचित आणि शोषितांचे आरक्षण खाऊ इच्छितात. एएमयू, जामियामध्ये एससी एसटी ओबीसीचे आरक्षण रद्द करण्यात आले. जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम ३७० लागू करुन एससी, एसटी, ओबीसीचे आरक्षण रद्द करण्यात आले. हे पक्ष मागच्या दाराने आरक्षण तोडण्याचे काम करत आहेत. बंगालमध्ये मुस्लिम जातींना ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यात आले. कर्नाटकातही मुस्लिमांना ओबीसी आरक्षण दिले जात आहे. हा मुल्ला मौलवींचा नमाजवाद आहे,' अशी बोचरी टीकाही त्यांनी यावेळी केली.

वक्फबद्दल तेजस्वी यादव यांना प्रश्नते पुढे म्हणतात, 'तेजस्वी यादव यांनी लालूजींचे संसदेतील विधान पहावे. वक्फच्या जमिनीवर किती रुग्णालये, महाविद्यालये, संस्था आहेत ते सांगा. कोण अल्पसंख्याक आहे, हे ते तराजूत मोजतात. वक्फ बोर्डाने यमुना नगरमधील गुरुद्वारावर दावा केला होता, तेव्हा कोणीही काहीही बोलते नाही. वक्फ दुरुस्ती कायदा आता संसदेने आणि राष्ट्रपतींनी मंजूर केलेला कायदा आहे, तर सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. याचा अर्थ असा की, त्यांना संसदेबद्दल किंवा न्यायव्यवस्थेबद्दल आदर नाही.

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डBJPभाजपाcongressकाँग्रेसRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी