शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
2
Post Office ची जबरदस्त स्कीम, एकदा पैसे गुंतवा; नंतर व्याजाद्वारेच होईल ५ लाखांची कमाई, जाणून घ्या
3
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
4
Netflix-Warner Bros Deal: नेटफ्लिक्सनं वॉर्नर ब्रदर्सच्या खरेदीची केली घोषणा; पाहा किती कोटींना झाली ही धमाकेदार डील
5
मारायचं होतं एकीला, हत्या केली दुसऱ्याच शिक्षिकेची, धक्कादायक माहिती आली समोर  
6
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
7
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
8
IndiGo: विमानाला १२ तास विलंब, मदन लाल इंडिगोवर भडकले, विमानतळाला 'फिश मार्केट' म्हणाले!
9
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
10
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिष कुलकर्णी अडकला विवाहबंधनात, पत्नीचं मराठी कलाविश्वाशी आहे खास कनेक्शन
12
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
13
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
14
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
15
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
16
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
17
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
18
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
19
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
20
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

"लाल किल्ल्यातील हिंसाचारामागे भाजप नेत्याचा हात? सत्याचा शोध घ्या"; सुब्रमण्यम स्वामी

By देवेश फडके | Updated: January 27, 2021 15:27 IST

लाल किल्ल्यावर जो हिंसाचार झाला, त्यामागे 'पीएमओ'च्या जवळील भाजप नेत्याचा हात आहे, असा संशय सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजचा आधार घेत सुब्रमण्यम स्वामी स्वामी यांनी घेतला आहे.

ठळक मुद्देखासदार सुब्रमण्यम स्वामींकडून भाजपला घरचा आहेरपीएमओ जवळील भाजप नेता लाल किल्ला हिंसाचारामागे असल्याचा संशयट्विटरच्या माध्यमातून सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केला संशय

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्याविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे राजधानी दिल्लीतआंदोलन सुरू आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. मात्र, या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. या हिंसाचारानंतर आंदोलकांनी लाल किल्ल्यात शिरून मोठी तोडफोड केली. पोलिसांनाही मारहाण केल्याचे समोर आले. याच पार्श्वभूमीवर भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मोठे विधान केले आहे. 

लाल किल्ल्यावर जो हिंसाचार झाला, त्यामागे 'पीएमओ'च्या जवळील भाजप नेत्याचा हात आहे, असा संशय सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजचा आधार घेत सुब्रमण्यम स्वामी स्वामी यांनी घेतला आहे. सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, दबक्या आवाजात एक चर्चा सुरू आहे. कदाचित त्यात काहीही तथ्य नसेल. ते खोटेही असू शकेल किंवा शत्रूंच्या आयटी सेलकडून वावड्या उठवल्या जात असतील की,  'पीएमओ'च्या जवळील व्यक्तीने लाल किल्ल्यावरील हिंसाचाराला खतपाणी घालण्याचे काम केले. नीट तपासून माहिती घ्यावी, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

शेतकरीआंदोलनातील हिंसाचारात सामील असलेला आरोपी दीप सिद्धू हा भाजप खासदार सनी देओल यांच्या निवडणूक प्रचारात सहभागी झाला होता, अशा आशयाचे ट्विटही सुब्रमण्यम स्वामी यांनी रिट्विट केले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचारानंतर सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्रही लिहिले आहे.  

मोदी आणि शाह यांची प्रतिमा मलीन

राज्यसभेचे सदस्य असलेल्या खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आणखी एक ट्विट केले आहे. यामध्ये, दिल्लीतील शेतकरी आंदोलकांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी प्रतिमा डागाळली गेली आहे, असे मत सुब्रमण्यम स्वामी व्यक्त केले आहे. याशिवाय त्यांनी पंजाबमधील काँग्रेस सरकारवरही जोरदार टीका केली. 

दरम्यान, दिल्लीतील ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचारात शेतकऱ्यांचे आक्रमक रुप पाहायला मिळाले. शेतकरी नेत्यांनी दीप सिद्धू यांच्यावर शेतकऱ्यांना भडकावल्याचा आरोप केला आहे. योगेंद्र यादव, भारतीय किसान युनियनचे हरियाणा प्रदेश अध्यक्ष गुरनाम सिंह यांनीही दीप सिद्धू यांच्यावर शेतकऱ्यांना भडकावून त्यांची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. मात्र, दीप सिद्धू यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. 

 

टॅग्स :delhi violenceदिल्लीSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीBJPभाजपाFarmerशेतकरीagitationआंदोलन