शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
2
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
3
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
4
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
5
नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत   
6
“डोळ्यांत पाणी, उद्ध्वस्त घरे, थंड पडलेले सरकार अन् शेतकऱ्यांचे दिवाळे”: विजय वडेट्टीवार
7
गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...
8
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
9
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
10
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
11
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
12
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
13
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
14
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
15
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
16
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या
17
Viral: बंगळुरुमध्ये घरकाम करणाऱ्या बाईचा पगार ₹४५,०००; महिलेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ...
18
धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
19
तंत्र-मंत्र, जारण-मारण, गेंडे आणि म्हशी! आसाममध्ये गूढ जंगलात काळी जादू करणारं गाव

भरधाव वेगात कार चालवून भिंतीला धडक; भाजपा खासदाराचा मुलगा अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 10:58 IST

पोलिसांकडून खासदार पुत्राला अटक; खासदाराच्या ट्विटमध्ये मोदींना टॅग

कोलकाता: भाजपा खासदार रुपा गांगुली यांचा मुलगा आकाशला पोलिसांनी अटक केली आहे. आकाशनं भरधाव वेगात कार चालवत एका भिंतीला धडक दिली. यावेळी आसपास असलेल्या अनेकांचा जीव थोडक्यात बचावला. आकाश मद्यधुंद अवस्थेत कार चालवत असल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला. त्यानंतर पोलिसांनी आकाशला ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याच्याविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली. गुरुवारी रात्री आकाशच्या काळ्या रंगाच्या सेदान कारनं गोल्फ गार्डन परिसरातील एका क्लबच्या भिंतीला धडक दिल्याची माहिती पीटीआयनं सूत्रांच्या हवाल्यानं दिली. यावेळी कारचा वेग अतिशय जास्त होता आणि अनेकांचे प्राण अगदी थोडक्यात वाचले, असं स्थानिकांनी सांगितलं. कारनं भिंतीला धडक दिल्यानंतर भिंतीचा काही भाग कोसळला. त्यामुळे आकाश आतच अडकला. भरधाव येणारी कार पाहताच अनेकजण बाजूला झाले. त्यामुळे यामध्ये कोणीही जखमी झालं नाही. कारनं भिंतीला धडक दिल्याची माहिती समजताच जवळच राहणाऱ्या आकाशच्या वडिलांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आकाशला कारमधून बाहेर काढलं. आकाशनं मद्यधुंद अवस्थेत भिंतीला धडक दिल्याचा आरोप स्थानिकांनी केला. त्यानंतर पोलिसांनी आकाशला ताब्यात घेतलं. यानंतर आज सकाळी जाधवपूर पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ४२७, २७९ आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अंतर्गत आकाशला अटक केली. यानंतर खासदार रुपा गांगुलींनी एक ट्विट करत कायदा त्याचं काम करेल, असं म्हटलं. 'माझ्या मुलाच्या कारला घराजवळ अपघात झाला. या प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. त्यात कोणताही पक्षपात किंवा राजकारण होऊ नये. माझं माझ्या मुलावर प्रेम आहे आणि आम्ही त्याची काळजी घेऊ. पण कायद्याला त्याचं काम करू द्यावं,' असं ट्विट त्यांनी केलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग केलं आहे. 'मी काहीही चुकीचं करत नाही आणि सहनही करत नाही. मी बिकाऊ नाही,' असं गांगुलींनी त्यांच्या ट्विटमध्ये पुढे म्हटलं आहे.  

टॅग्स :BJPभाजपाAccidentअपघात