शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
3
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
4
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
5
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
6
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
7
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
8
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
9
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
10
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
11
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
12
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
13
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
14
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
15
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
16
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
17
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
18
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
19
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
20
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार

"मुख्यमंत्री बनण्यासाठी लालू यादवांनी माझ्या पतीला मारलं", महिला खासदाराचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 13:45 IST

MP Rama Devi on Lalu Prasad Yadav :  लालूप्रसाद यादव यांच्यावर भाजपाच्या महिला खासदाराने गंभीर आरोप केला आहे. 

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्यावर भाजपाच्या महिला खासदाराने गंभीर आरोप केला आहे. बिहारमधील शिवहर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रमा देवींनी लालूंवर सडकून टीका केली. "लालू प्रसाद यादव यांनी मुख्यमंत्री बनण्यासाठी माझ्या पतीला मारले. या लोकांनी लाज सोडली असून पैसे खाण्यासाठी इथे बसले आहेत. त्यांच्या पक्षात रोज कोणता ना कोणता घोटाळा होत असतो", असा आरोप रमा देवी यांनी केला. 

रमा देवी यांनी पाटण्यातील गर्दबीनाग येथे आंदोलकांना संबोधित करताना आरजेडीवर हल्लाबोल केला. त्यांनी सत्ताधारी राष्ट्रीय जनता दल आणि महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला. 'नारी शक्ती'चा सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला असून महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याचे काम केले. दुसरीकडे, बिहारमधील सत्ताधारी केवळ आपल्या महिलांना सन्मान देण्याचे काम करतात, असेही त्यांनी नमूद केले.

लालू यादवांवर हल्लाबोल खासदार रमा देवी यांनी सांगितले की, लालू यादव अब्जाधीश आणि कोट्यधीश झाले आहेत. त्यांना लाज वाटत नाही. तुरुंगात जा, तुरुंगातून बाहेर या, जामीन घ्या एवढेच काम उरले आहे. आता जातीय गणनेतही घोटाळा झाला आहे. हा घोटाळा खपवून घेतला जाणार नाही. हा अपमान सहन केला जाणार नाही. आम्ही प्रत्युत्तर देण्यासाठी पुरेसे मजबूत आहोत आणि नक्कीच याचा प्रतिकार करू. सर्व राक्षसांचा नाश करण्यासाठी रमा देवी पुरेशी आहे.

पंतप्रधानांचे तोंडभरून कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना रमा देवी म्हणाल्या, "पंतप्रधानांच्या नेतृत्वात जसे सरकार चालत आहे असाच कारभार चालू राहिला पाहिजे. नितीश कुमार काय करत आहेत? ते त्यांना देखील माहिती नाही. कारण आता सर्वकाही लालू यादवांच्या हातात आहे. लालू यादवच सगळे काही पाहत असून बिहारला बर्बाद करण्याचे काम करत आहेत."

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलBJPभाजपाBiharबिहारMember of parliamentखासदार