देशातील सर्वात मोठी खासगी विमान कंपनी 'इंडिगो' पुन्हा एकदा आपल्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. चांदनी चौकचे भाजपा खासदार प्रवीण खंडेलवाल यांच्यासोबत धक्कादायक घटना घडली आहे. खासदार आणि 'कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स' (CAIT) चे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी इंडिगोसोबतच्या प्रवासाचा आपला भयंकर अनुभव शेअर केला आहे. त्यांनी या प्रवासाचे वर्णन 'अत्यंत लाजिरवाणा अनुभव' असं केलं आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
भाजपा खासदार खंडेलवाल यांनी शुक्रवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एक पोस्ट करत म्हटलं की, "मी आज नवी दिल्लीहून बेळगावसाठी फ्लाईट नंबर 6E-5237 ने प्रवास केला. मी माझ्या इच्छित स्थळी तर पोहोचलो, पण माझं सामान मिळालं नाही. मला माझ्या सामानाबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही."
"मला प्रचंड मानसिक त्रास, गैरसोय आणि आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे, कारण मला तातडीने आवश्यक कपडे आणि पर्सनल वस्तू खरेदी कराव्या लागत आहेत. माझ्या सामानामध्ये अत्यंत महत्त्वाचे आणि माझे मौल्यवान डॉक्युमेंट्स देखील आहेत, ज्यामुळे परिस्थिती अधिकच चिंताजनक बनली आहे. अशा प्रकारचा निष्काळजीपणा आणि सामानाचं इतकं खराब व्यवस्थापन पूर्णपणे अस्वीकार्य आहे."
प्रवीण खंडेलवाल यांनी पुढे म्हटले की, जर एका विद्यमान खासदाराला अशा प्रकारचा अनुभव येत असेल, तर सामान्य प्रवाशांच्या हालअपेष्टांची कल्पनाही करवत नाही. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांना टॅग करत लिहिले की, "मला या प्रकरणावर तातडीने स्पष्टीकरण हवं आहे."याव्यतिरिक्त, त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री राम मोहन नायडू यांनाही टॅग केलं. खंडेलवाल यांनी या प्रकरणी केंद्रीय मंत्र्यांकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
Web Summary : BJP MP Praveen Khandelwal's luggage went missing on an IndiGo flight from Delhi to Belagavi. He criticizes IndiGo's poor handling, citing mental agony, inconvenience, financial loss, and missing documents. He urges intervention from aviation minister.
Web Summary : भाजपा सांसद प्रवीण खंडेलवाल का सामान इंडिगो की दिल्ली-बेलगावी उड़ान में गायब हो गया। उन्होंने इंडिगो के खराब प्रबंधन की आलोचना की, मानसिक पीड़ा, असुविधा, वित्तीय नुकसान और दस्तावेजों के गुम होने का हवाला दिया। उन्होंने विमानन मंत्री से हस्तक्षेप का आग्रह किया।