भाजपाच्या खासदार पूनम मदान पडल्या गटारात

By Admin | Updated: May 16, 2016 12:36 IST2016-05-16T12:36:30+5:302016-05-16T12:36:50+5:30

गुजरातमधील भाजपाच्या खासदार पूनम मदान गटारात पडून जखमी झाल्याची घटना गुजरातच्या जल्ला राम नगर येथे घडली आहे.

BJP MP Poonam Madan falls in gutter | भाजपाच्या खासदार पूनम मदान पडल्या गटारात

भाजपाच्या खासदार पूनम मदान पडल्या गटारात

ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. १६ - गुजरातमधील भाजपाच्या खासदार पूनम मदान गटारात पडून जखमी झाल्याची घटना गुजरातच्या जल्ला राम नगर येथे घडली आहे. मदान या जामनगरमध्ये अतिक्रमण हटाव आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी व पाहणी करण्यासाठी आल्या होत्या. चालता चालता कार्यकर्त्यांशी संवाद साधणार मदान यांचा तोल गेला आणि त्या गटारात पडल्या. त्यांच्यासोबत असणारे काही कार्यकर्तेही या सात फूट खोल गटारात पडून जखमी झाले. 
इतर कार्यकर्ते व अधिका-यांनी तातडीने मदान यांच्यासह इतरांना बाहेर काढले व उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले

Web Title: BJP MP Poonam Madan falls in gutter