शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

चपलेनं मारलं; 'शिस्तप्रिय' भाजपाच्या खासदार - आमदारामध्ये 'राडा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 19:54 IST

सपा आणि बसपामध्ये झालेल्या आघाडीने उत्तर प्रदेशात भाजपाच्या अडचणी वाढवल्या आहेत. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपातील अंतर्गत वादही चव्हाट्यावर येत आहे.

संत कबीरनगर - सपा आणि बसपामध्ये झालेल्या आघाडीने उत्तर प्रदेशातभाजपाच्या अडचणी वाढवल्या आहेत. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपातील अंतर्गत वादही चव्हाट्यावर येत आहे. संत कबीरनगर मतदारसंघामध्ये आज एका कार्यक्रमादरम्यान भाजपा खासदार शरद त्रिपाठी आणि आमदार राकेश सिंह यांच्यात जोरदार हाणामारी झाली. या प्रकाराच्या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम काही दिवसांतच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या उत्तर प्रदेशमध्ये सत्ताधारी असलेल्या भाजपाकडून विविध ठिकाणी उदघाटन आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. असाच कार्यक्रम संत कबीरनगर येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला खासदार शरद त्रिपाठी आणि मेहदावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार राकेश सिंह यांच्यासह भाजपाचे इतर नेते उपस्थित होते.

यावेळी भूमिपूजनाच्या शिलालेखावर आपले नाव नसल्याने खासदार शरद त्रिपाठी संतप्त झाले. त्यावरून त्यांची राकेश सिंह यांच्याशी बाचाबाची झाली. त्यावेळी शरद त्रिपाठी यांनी चप्पल काढून राकेश सिंह यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आमदार राकेश सिंह यांनीही त्रिपाठी यांना प्रत्युत्तर देत मारहाण केली. अखेर तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी मध्यस्थी करत हे भांडण सोडवले व दोन्ही नेत्यांना एकमेकांपासून दूर नेले. 

या कार्यक्रमाचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे.  त्यात खासदार शरद त्रिपाठी हे इंजिनिअरशी बोलताना दिसत आहेत. तसेच दोघांचे बोलणे सुरू असताना आमदार राकेश सिंह हे तिथे आल्याचे  दिसत आहे. मारहाणीच्या या प्रकारानंतर आमदार राकेश सिंह यांचे समर्थक संतप्त झाले आहेत. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाला घेराव घातला. तसेच राकेश सिंह यांच्या अपमानाचा बदला घेतला जाईल, असे आव्हानही दिले आहे. दरम्यान, पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून खासदार शरद त्रिपाठी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात बंद करून ठेवले आहे. तसेच तिथे मोठ्या प्रमाणावर फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे.  

 

दरम्यान, या प्रकाराची गंभीर दखल भाजपाच्या नेतृत्वाने घेतली आहे. तसेच संबंधित खासदार आणि आमदारांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती उत्तर प्रदेश भाजपाध्यक्ष महेंद्रनाथ पांडे यांनी दिली आहे. 

 

 

टॅग्स :BJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliticsराजकारण