लिव्ह इन रिलेशनशिप धोकादायक आजार, प्रेमविवाहातही परवानगी हवी; भाजप खासदाराची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 02:52 PM2023-12-07T14:52:12+5:302023-12-07T14:54:49+5:30

लिव्ह-इन रिलेशनशिपवर बंदी घालावी आणि त्यासाठी कायदा करावा अशी मागणी भाजप खासदार धरमबीर सिंह यांनी केली आहे.

BJP MP Dharambir Singh has demanded that live in relationship is a dangerous disease, love marriage should also be allowed | लिव्ह इन रिलेशनशिप धोकादायक आजार, प्रेमविवाहातही परवानगी हवी; भाजप खासदाराची मागणी

लिव्ह इन रिलेशनशिप धोकादायक आजार, प्रेमविवाहातही परवानगी हवी; भाजप खासदाराची मागणी

लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, आज भाजप खासदार धरमसिंह यांनी लिव्ह-इन रिलेशनशीपवर प्रश्न उपस्थित केले आहेत. धरमबीर सिंह यांनी लिव्ह-इन रिलेशनशिपला धोकादायक आजार असल्याचे सांगून त्याविरोधात कायदा करण्याची मागणी केली आहे. हरियाणातील भिवानी-महेंद्रगडचे खासदार धरमबीर सिंह म्हणाले की, लिव्ह-इन रिलेशनशिपसारख्या आजाराला समाजातून उखडून टाकण्याची गरज आहे. याविरोधात कायदा करावा, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. झिरो अवरमध्ये हा मुद्दा उपस्थित करताना त्यांनी प्रेमविवाहावरही प्रश्न उपस्थित केले. सिंह म्हणाले की, प्रेमविवाहांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे लग्नासारख्या बाबतीत वधू-वरांच्या पालकांची संमती आवश्यक असायला हवी, असंही ते म्हणाले. 

चीनच्या माजी परराष्ट्र मंत्र्यांना हालहाल करून मारले; ब्रिटनमधून खळबळजनक दावा

खासदार धरमबीर सिंह  म्हणाले, 'मला हा गंभीर मुद्दा संसद आणि सरकारसमोर मांडायचा आहे. भारतीय संस्कृती वसुधैव कुटुंबकमसाठी ओळखली जाते. आपली सामाजिक बांधणी जगातील इतर अनेक देशांपेक्षा वेगळी आहे. विविधतेतील एकतेच्या आपल्या संस्कृतीचा संपूर्ण जगावर प्रभाव पडला आहे. भारतात अ‍ॅरेंज्ड मॅरेजची परंपरा फार पूर्वीपासून आहे. आजही समाजातील एक मोठा वर्ग कुटुंब आणि नातेवाईकांच्या संमतीनेच लग्नाला महत्त्व देतो. लग्नात मुलगा आणि मुलगी यांच्या संमतीशिवाय घरातील सदस्यांशीही सल्लामसलत केली जाते. याशिवाय अनेक बाबीही विचारात घेतल्या जातात.

"लोक कौटुंबिक पार्श्वभूमी आणि सामाजिक मूल्ये लक्षात घेऊन लग्न करतात. लग्नासारख्या पवित्र बंधनाचे पावित्र्य राखले पाहिजे, असे ते म्हणाले. खासदार धरमबीर म्हणाले, 'लग्न हे पवित्र नाते मानले जाते, जे ७ पिढ्या टिकते. भारतात घटस्फोटाचे प्रमाण केवळ १.१ टक्के आहे, तर अमेरिकेत ते ४० टक्के आहे. ठरवून केलेल्या लग्नात घटस्फोट फार कमी वेळा होतात, असं समोर आलं आहे, अलीकडच्या काळात देशात घटस्फोटाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याचे कारण म्हणजे प्रेमविवाहात, यामुळे अधिक नाती तुटतात, असंही धरमबीर सिंह म्हणाले.

सिंह म्हणाले, माझी सूचना आहे की प्रेमविवाहात पालकांची मान्यता अनिवार्य करावी. याचे कारण असे की, देशाच्या मोठ्या भागात एकोप्याने विवाह होत नाहीत. प्रेमविवाहावरून गावात अनेक वाद होतात. अशा भांडणात अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात. अशा परिस्थितीत दोन्ही घरच्यांच्या मान्यतेने लग्न होणे आवश्यक आहे. आता आणखी एक नवीन आजार उद्भवला आहे, ज्याला लिव्ह-इन रिलेशनशिप म्हटले जात आहे. या अंतर्गत दोन व्यक्ती लग्नाशिवाय एकत्र राहू शकतात.

श्रद्धा केसची दिली माहिती

यावेळी सिंह यांनी श्रद्धा हत्याकांडाचाही उल्लेख केला. धरमबीर सिंह म्हणाले, 'पाश्‍चिमात्य देशांमध्ये असे संबंध सामान्य आहेत, परंतु आपल्या समाजातही हे दुष्प्रवृत्ती वेगाने पसरत आहे. त्याचे परिणाम अत्यंत घातक आहेत. नुकतेच श्रद्धा आणि आफताब पूनावालाचे प्रकरणही समोर आले. दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहत होते. आता अशी प्रकरणे रोज समोर येत आहेत. यामुळे आपली संस्कृती नष्ट होत असून समाजात द्वेष निर्माण होत असल्याचेही खासदार सिंह म्हणाले.

Read in English

Web Title: BJP MP Dharambir Singh has demanded that live in relationship is a dangerous disease, love marriage should also be allowed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.